Shehnaaz Gill joins Salman Khan...  Google
मनोरंजन

शहनाझ गिलला लागली बॉलीवूडची लॉटरी, सलमानच्या सिनेमातून करणार पदार्पण

बिग बॉस शो मध्ये सामिल झालेली शहनाझ गिल तिच्या क्युटनेसमुळे नेहमीच सलमानची फेव्हरेट राहिली आहे.

प्रणाली मोरे

बिग बॉस(Big Boss) फेम शहनाझ गिल(Shehnaaz Gill) तिच्या क्युटनेसमुळे नेहमीच प्रेक्षकांची लाडकी राहिली आहे. तिच्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांची काही कमी नाही. बिग बॉस पासूनच ती सलमानची(Salman Khan) फेव्हरेट बनली आहे. शहनाझ गिलचा क्यूट अदंज आणि तिचं बोलणं सलमानला नेहमीचं आवडायचं. सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर बिग बॉस १५ च्या सिझनमध्ये जेव्हा शेहनाझ गिल गेली होती तेव्हा ती भावूक झाल्यावर सलमाननं ज्या पद्धतीनं तिला समजावलं होतं तेव्हा अनेकांचे डोळे भरुन आले होते. आता शहनाझ गिल आणि सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक चांगली अपडेट आमच्या हाती लागली आहे.

बातमी आहे की सलमान खानच्या सिनेमामधून शहनाझ गिल बॉलीवूडमध्ये एन्ट्री करीत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सलमान खान कभी ईद,कभी दिवाली' या सिनेमातून शहनाझ गिलला संधी देत असल्याचं बोललं जात आहे. आयुष शर्मा सोबत ती या सिनेमात दिसणार आहे. पण अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केली गेली नाही. डान्सर,अॅक्टर,टी.व्ही शो अॅंकर राघव जुयाल याच्याबाबतीही कानावर पडलं आहे की,तो देखील सलमानच्या 'कभी ईद,कभी दिवाली' सिनेमात काम करणार आहे. पण यावरही अधिकृतरित्या घोषणा करण्यात आलेली नाही.

काही दिवसांपूर्वीच सलमान खानचा मेव्हणा आयुष शर्माची 'कभी ईद,कभी दिवाली' या सिनेमात वर्णी लागली आहे. याआधी आयुष शर्मा आणि सलमान खान 'अंतिम- द फायनल ट्रुथ' या सिनेमात एकत्र काम करताना दिसले होते. आयुष शर्मासाठी म्हणजेच आपल्या मेव्हण्यासाठी सलमाननं मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेला बाहेरचा रस्ता दाखवल्याचं बोललं जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi यांची १४ नोव्हेंबरला नवी मुंबईत सभा, वाहतुकीत मोठा बदल, महत्त्वाचे मार्ग बंद ठेवणार

IPL 2025: दिल्ली संघात २०११ वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूची एन्ट्री! १८ व्या हंगामात सांभाळणार मोठी जबाबदारी

Sharad Pawar : चुकीची कामे किती करावी, फसवेगिरी किती करावी; फसवेगिरी करणाऱ्यांना धडा शिकवा

Women’s Asian Champions Trophy: दीपिकाच्या गोलमुळे भारताचा विजय; दक्षिण कोरियावर ३-२ने मात

Narendra Modi: पंतप्रधान मोदींनी पुण्यात केले छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांना नमन; म्हणाले- छत्रपतींच्या पुण्यभूमीमध्ये औरंगजेबाचे.....

SCROLL FOR NEXT