Bigg Boss 16 Shiv Thakare: बिग बॉस १६ ची ग्रँड फिनाले काल पार पाडली. ग्रँड फिनालेची ट्रॉफी एम. सी. स्टॅनने जिंकली. बिग बॉस १६च्या ग्रँड फिनालेमध्ये मराठमोळा शिव ठाकरे उपविजेता ठरला.
शिवचा सुरुवातीपासूनचा खेळ बघता शिव ठाकरे बिग बॉस १६ च्या ट्रॉफीवर असं सर्वांना वाटत होतं. पण शिवला उपविजेतेपद मिळालं. आणि त्याच्या सर्व फॅन्सची निराशा झाली.
(shiv thakare comment on why he played in mandali)
शिव ठाकरे आणि मंडलीवर प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केलं. शिव, स्टॅन, सुम्बुल, साजिद, निम्रीत, अब्दू असे सहा जण मंडलीचा हिस्सा होते. इतकंच नव्हे या सहा जणांनी हक से मंडली असं जॅकेट ग्रँड फिनालेला परिधान करून स्पेशल डान्स केला.
शिव ठाकरे आणि मंडलीला अनेक जणांकडून हिणवण्यात आलं. घराबाहेर आल्यावर शिव ठाकरेची मुलाखत झाली. त्या मुलाखतीत शिव ठाकरे मंडली मधून खेळतो असा आरोप त्याच्यावर लावण्यात आला. या प्रश्नावर दिलेल्या उत्तरावर सर्वांचं मन जिंकलं.
शिव त्याच्या नेहमीच्या स्मितहास्याने उत्तर देताना म्हणाला, "मित्र बनवणं ही नशीबाची गोष्ट आहे. त्यासाठी जिगर पाहिजे. खऱ्या आयुष्यात एक मित्र कमावून दाखवा. मी सहा मित्र त्या घरात कमावले.
ही काय मस्करीची गोष्ट नाही. तुम्हाला खरंच मित्र बनवायचं असेल ना तर बाहेर एक मित्र या जगात बनवून दाखवा जो खरा आहे. मी त्या घरात ५ मित्र बनवले. ही फार मोठी गोष्ट आहे."
शिव पुढे म्हणाला, "तुम्हाला मैत्री नाही समजली. तुम्हाला मैत्री निभावता आली नाही किंवा कोणाशीही तुमची मैत्री झाली नाही. मी फार नशीबवान आहे की मी इतके मित्र घेऊन चाललोय. मी किती श्रीमंत आहे बघा..!" अशाप्रकारे शिवसाठी मंडली किती महत्वाची आहेत. हेच यावरून समजून येतं. शिव ठाकरे घरात असताना कायमच मंडलीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला.
शिव ठाकरे बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनचं विजेतेपद पटकावलं होतं. बिग बॉस १६ शिव ठाकरेने खास गाजवला.
शिव ठाकरे बिग बॉसच्या घरात होता होता तेव्हा शिव ठाकरे विजयी भव असा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल होता. बिग बॉस नंतर शिवला रोहित शेट्टीकडून खतरो के खिलाडी १३ ची ऑफर मिळाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.