Shiv Thakare Clean Juhu Beach: बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सिझनचा विजेता आणि बिग बॉस हिंदीच्या माध्यामातुन घराघरात पोहचलेला शिव ठाकरे हा सध्या रोहित शेट्टीच्या लोकप्रिय रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी 13' मध्ये अनेक भयानक स्टंट करतांना दिसत आहे.
शिव ठाकरेने जरी बिग बॉस हिंदीचा सिझन जिंकला नसला तरी त्याने चाहत्यांचे मन मात्र नक्कीच जिंकले. तो सोशल मीडियावर खुप सक्रिय असतो. नेहमी चाहत्यांसोबत त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेयर करत असतो.
सध्या शिव त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याचे नाव अभिनेत्री डेझी शाहसोबत जोडलं जात आहे. मात्र दोघांनी देखील या प्रकरणावर काहीही भाष्य केलेले नाही. शिव चाहत्यांचा लाडका आहे. तो नेहमी असं काही करतो की चाहते त्याचे कौतुक करतात. आता देखील शिवने अशी काहीतरी कृती केली आहे की नेटकऱ्यांनी त्याचे खुपच कौतुक केले.
मुंबईतील समुद्रकिनारा नेहमी स्वच्छ ठेवावा असं आवाहन अनेकदा सेलिब्रेटी करत असतात. तर कधी ते स्वत:वर पुढाकारही घेतात.
असचं काहीस यावेळी शिव ठाकरेने केले आहे. सध्या सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे जो सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेयर केला आहे.
या व्हिडिओत शिव ठाकरे समुद्राजवळ पडलेला कचरा गोळा करतांना दिसतोय. केवळ शिवच नाही तर त्याची पुर्ण टिम यावेळी कचरा उचलतांना दिसत आहे. तो आणि त्याची टिम समुद्र किनारा स्वच्छ करत आहे.
शिव हाताने कचरा उचलून टोपलीत टाकत आहे. त्याच्या या व्हिडिओला अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. केवळ भारतातल्याच नाही तर पाकिस्तांनी चाहत्यांनी देखील त्याच्या या व्हिडिओवर कमेंट करत त्याचे कौतुक केले आहे.
एकानं लिहिलं की, 'चाहत्यांना तुझा शिव ठाकरे यांचा खूप अभिमान आहे'. तर दुसऱ्याने लिहिलं की, 'मराठमोळा शिव आम्हाला तुझा गर्व आहे.' तर एकानं लिहलं की, 'या जगाला तुमच्यासारख्या, साध्या, निस्वार्थी आणि दयाळू लोकांची खूप गरज आहे.'
तर शिवने देखील त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीला हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने स्टोरीत लिहिले की, “आपण एकत्र मिळून बदलू शकतो”.
शिव ठाकरे सध्या खतरों के खिलाडी 13 दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.