Shivali Parab on Namtra Sambherao And Yogesh Sambherao: गेल्या काही वर्षात सोनी मराठी वाहिनीवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (maharashtrachi hasyajatra) या मालिकेने अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावले आहे. एकास एक पात्र, उत्तम संहिता आणि ते सादर करणारे इरसाल नमुने म्हणजेच आपले हास्यरथी यांनी आपलयाला खळखळून हसवले.
याच कार्यक्रमातील एक अवली कलाकार म्हणजे शिवाली परब. अत्यंत कमी वयात कॉमेडी क्विन अशी ओळख तिने मिळवली आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून आपल्या विनोदाने आणि अभिनयाने सर्वांची मनं जिंकली.
सध्या महाराष्ट्रात शिवालीची प्रचंड हवा आहे. शिवालीने नुकतीच सकाळ Unplugged मध्ये एक खास मुलाखत दिली. यावेळी तिने अभिनेत्री नम्रता संभेराव आणि तिचा पती योगेश संभेराव यांचे आभार मानले. ती म्हणाली, ते आहेत म्हणून मी आज इथे आहे.. तर जाणून घेऊया ती नेमकं असं का म्हणाली..
(Shivali Parab talks about namrata sambherao and her husband yogesh sambherao maharashtrachi hasya jatra career)
या मुलाखतीत शिवालीला विचारले की तु नेमकं हास्य जत्रेत कशी आली.. तुला कुणी ही संधी दिली. त्यावर उत्तर देताना शिवालीने एक खास किस्सा सांगितला. ती म्हणाली, 'मी एकांकिका करत होते, नाटक करत होते. कॉलेज मधून बाहेर पडल्यावर अनेक इवेंट्स, दिग्दर्शन सहाय्य अशी बरीच कामं करत होते. पण अभिनय करावा असं वाटत होतं म्हणून मी जोगेश्वरीचा एक ग्रुप जॉइन केला.'
'त्या ग्रुपने एक इवेंट घेतला होता.. बदलापूर आगरी महोत्सव म्हणून.. त्या शो मध्ये नम्रता संभेराव आणि अरुण कदम लिड करत होते. आणि त्यांच्या हाताशी काही मुलं होती. पण त्यांच्यापैकी कुणालाच आगरी भाषा य्एट नव्हती. आणि माझ्या समोरच तालिम सुरू असल्याने मी त्यांना मदत केली. तेव्हा नम्रता ताई म्हणाली अरे आपण हिलाही आपल्यात सामील करू घेऊ.. ही मस्त भाषा बोलतेय. मग तो सगळा इवेंट झाला.. मी त्यांच्या सोबत काम केलं'
हेही वाचा : Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
पुढे ती म्हणाली, 'त्यावेळी तिथून जाताना मला नम्रता ताई आणि योगेश दादाने सांगितलं.. की आम्ही तुझ्यासाठी नक्की काहीतरी करू.. तो इवेंट झाला आणि काहीच दिवसात मला एक फोन आला की तुम्ही या ठिकाणी ऑडिशन साठी या .. नम्रता संभेराव यांनी तुमच्याशी संपर्क करायला सांगितला आहे. ती ऑडिशन हास्य जत्रेची होती. ज्यात मी सिलेक्ट झाले आणि माझा हा प्रवास इथवर आला. त्यामुळे नम्रता ताई आणि तिचे पती योगेश दादा यांचे मी मानावे तेवढे आभार कमी आहेत. कारण त्यांनी संधी दिली म्हणून मी आज इथे आहे'.. अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.