Shreyas Talpade Health Update esakal
मनोरंजन

Shreyas Talpade Health Update: कशी आहे श्रेयसची तब्येत, डॉक्टरांनी काय सांगितले?

प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपडेला वेलकम टू द जंगल चित्रपटाच्या सेटवर हदयविकाराचा झटका आला अन् चाहत्यांना मोठा धक्का बसला.

युगंधर ताजणे

Shreyas Talpade Health Update : प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपडेला वेलकम टू द जंगल चित्रपटाच्या सेटवर हदयविकाराचा झटका आला अन् चाहत्यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर त्याला तातडीनं मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. यानंतर आता डॉक्टरांनी त्याच्या तब्यतेविषयी माहिती दिली आहे.

४७ वर्षीय श्रेयस हा गेल्या दोन दशकांहून अधिक काळ मनोरंजन विश्वात सक्रिय आहे. तो त्याच्या प्रभावी भूमिकांमुळे नेहमची चाहत्यांच्या कौतुकाचा विषय राहिला आहे. चित्रपट, मालिकांमधील त्याच्या भूमिकांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अशात श्रेयसला आलेल्या हदयविकाच्या झटक्याच्या बातमीनं चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. तो बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या वेलकम टू द जंगल नावाच्या चित्रपटाचे शुटींग करत होता. त्यावेळी ही घटना घडली.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार आता श्रेयसवर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. येत्या काही दिवसांत त्याला डिस्चार्जही देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिले आहे. श्रेयसच्या प्रकृतीविषयी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टनंतर चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

यंदाच्या वर्षी अशीच एक घटना प्रसिद्ध अभिनेत्री सुश्मिता सेनच्याबाबतही घडली होती. ४७ वर्षीय सुश्मिता ही राजस्थानमध्ये आर्या ३ च्या शुटींगमध्ये व्यस्त होती. त्याचवेळी तिला हदयविकाराचा झटका आला होता. याबाबत सुश्मितानं इंस्टावर सविस्तर पोस्ट लिहून चाहत्यांना त्याविषयी माहिती दिली होती. तिच्यावरही अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मला हदयविकाराचा मोठा झटका येऊन गेला हे माझ्या डॉक्टरांनी मला सांगितले. असे सुश्मितानं त्या पोस्टमध्ये म्हटले होते.

श्रेयस हा फिरोज नाडियावाला यांच्या वेलकम टू द जंगल नावाच्या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त असताना त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चित्रपटाविषयी बोलायचे झाल्यास त्यात श्रेयस सोबत अक्षय कुमार, अर्शद वारसी, परेश रावल, तुषार कपूर, दिशा पटानी, जॅकलीन फर्नांडिझ, लारा दत्ता यांच्याही भूमिका आहेत.

काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारनं त्याच्या या चित्रपटाचा एक बीटीएस व्हिडिओ शेयर केला होता. त्यामध्ये श्रेयसनं केलेल्या एका सीनचे चाहत्यांनी कौतुक केले होते. तो त्याच्या सहकारी कलाकारांसोबत मोठ्या गमतीनं तो सीन करत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS: विराटवर शरीरवेधी मारा करा... कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या माजी विकेटकिपर नक्की काय म्हणाला?

मतदानासाठी शेवटचे १५ मिनिटे शिल्लक! सोलापूर जिल्ह्यात ५७.०९ टक्के मतदान; दक्षिण सोलापूर, शहर मध्य व शहर उत्तर या ३ मतदारसंघात सर्वात कमी मतदान

Champions Trophy 2025: भारत-पाकिस्तान वादात ICC चं मरण, कायदेशीर कारवाईची टांगती तलवार; जाणून घ्या नेमकं कारण

Maharashtra Election: राज्यभरात मतदान केंद्रांची तोडफोड, कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; जाणून घ्या कुठे काय घडलं?

Wardha Vidhan Sabha Voting: वर्ध्यात निलेश कराळे मास्तरांना मारहाण; Video Viral

SCROLL FOR NEXT