shreyas talpade new hindi movie ajagratha with radhika kumarswami pan india released  SAKAL
मनोरंजन

Shreyas Talpade: श्रेयस तळपदेने केली त्याच्या नवीन सिनेमाची घोषणा, माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी झळकणार

Devendra Jadhav

Shreyas Talpade New Movie: श्रेयस तळपदे हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. श्रेयसने आजवर हिंदी, मराठी सिनेमांमधून स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली. इतकंच नव्हे तर साऊथच्या पुष्पाला आवाज देऊन श्रेयसने दाक्षिणात्य इंडस्ट्रीत सुद्धा स्वतःचं नाव कमावलं.

सध्या दिवाळीच्या मुहूर्तावर श्रेयसने त्याच्या नवीन सिनेमाची घोषणा केली. या सिनेमाचं नाव आहे अजाग्रत. या सिनेमाबद्दल सविस्तर जाणुन घेऊ

'अजाग्रत' या हिंदी चित्रपटाद्वारे श्रेयस पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'अंधारामागील सावल्या' अशी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटात रहस्यमयी कथानक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात माजी मुख्यमंत्री यांची पत्नी, कन्नडची अभिनेत्री राधिका कुमारस्वामी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या व्यतिरिक्त सिनेमात सुनील, राव रमेश, जगपती बाबू, आदिथ्य मेनन, देवराज, अच्युत कुमार, साई कुमार, समुद्र कानी, मोहन लाल यांच्यासह अन्य कलाकार आहेत.

या चित्रपटात जिवंतपणा आणण्यासाठी सेटची रचना अतिशय बारकाईने केली आहे. शुटींगचे स्थळ अधिक नैसर्गिक वाटण्यासाठी दिग्दर्शक शशिधर यांनी विशेष मेहनत घेतली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून शशिधर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. रवी राज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून हा चित्रपट पॅन इंडिया नेण्याची त्यांची इच्छा आहे.

'अजाग्रत' हा एक ॲक्शन थ्रिलर असून यात श्रेयस तळपदेसोबत अजून एक बॉलिवूड अभिनेता झळकणार आहे. या अभिनेत्याचं नाव लवकरच समोर येणार आहे, ज्यामुळे चित्रपटाची उत्सुकता वाढेल.

हा चित्रपट श्रेयस तळपदेसाठी खास असणार आहे. सात वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित होणारा त्याचा हा पहिला पॅन इंडिया चित्रपट असणारा आहे. आकर्षक कथानक, कलाकार आणि दूरदर्शी दिग्दर्शनासह 'अजाग्रत' भारतीय चित्रपटसृष्टीत नवीन बेंचमार्क सेट करण्यासाठी सज्ज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chess Olympiad 2024: भारताने जिंकले ऐतिहासिक सुवर्णपदक! महिला-पुरुष दोन्ही संघ ठरले 'अव्वल'

अंधेरीचा राजाच्या विसर्जनादरम्यान बोट उलटली; १० ते १२ जण पाण्यात पडले, पाहा थरारक व्हिडिओ

Latur Crime : गर्भपात करताना बोगस डॉक्टराला रंगेहात पकडले; वैद्यकीय अधिकारी व पोलिस पथकाची कामगिरी

'टीम इंडियात आलो तेव्हा हरभजनची जागा भरण्याची जबाबदारी...', R Ashwin मोकळेपणाने झाला व्यक्त

Latest Maharashtra News Live Updates: भारतीय महिला संघाने बुडापेस्ट येथे अझरबैजानला हरवून पहिले बुद्धिबळ ऑलिम्पियाड विजेतेपद पटकावले

SCROLL FOR NEXT