Shruti Haasan and Santanu Hazarika have been dating since 2020. Google
मनोरंजन

श्रुती हासननं लग्न झाल्याचं का लपवून ठेवलं? बॉयफ्रेंडनेच केला खुलासा

श्रुती हासन आणि शांतनु हझारिका 2020 सालापासून एकमेकांना डेट करीत आहेत.

प्रणाली मोरे

श्रुती हासन(Shruti Haasan) आणि शांतनु हझारिका(Santanu Hazarika) एकमेकांना 2020 पासनं डेट करीत आहेत. सोशल मीडियावर नेहमीच त्यांचे रोमॅंटिक फोटो ते शेअर करीत असतात. पण आता अचानक त्यांच्या नात्याची चर्चा होऊ लागली आहे. त्यांनी आपल्या नात्याचा खुलासा करताना म्हटलं आहे की,''त्याचं लग्न झालं आहे,पण कसं?'' खरं तर हे जाणून घेण्यासारखं आहे.

श्रुती हासन नेहमीच सोशल मीडियावर तिचे स्वतःचे आणि बॉयफ्रेंड शांतनु हझारिकासोबतचे फोटो आपल्या चाहत्यांसाठी शेअर करीत असते. 2020 पासून हे दोघे नात्यात आहेत. म्हणजे कोविडच्या कठीण प्रसंगात एकमेकांची साथ लाभल्यानं हे दोघे एकमेकांच्या अधिक जवळ आल्याचं मागे त्यांनी म्हटलं होतं. तेव्हापासनं आतापर्यंत त्यांचं नातं बहरतानाच सगळ्यांनी पाहिलं आहे. एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत शांतनुला विचारलं गेलं होतं,'श्रुती सोबतचं हे नातं पुढे नेण्यासाठी तो लग्नाचा विचार करीत आहे का?'' त्यावर त्यानं उत्तर देताना जो खुलासा केला आहे तो सगळ्यांना चकीत करुन सोडणारा आहे.

तो म्हणाला,''आम्ही मनातून केव्हाच लग्न केलं आहे. मनानं आम्ही एकमेकांचा पती-पत्नी म्हणून स्विकार केला आहे. आणि त्यामुळेच आमचं नातं अधिक घट्ट झालेलं पहायला मिळत आहे. आमच्यासाठी हे नातं अधिक स्पेशल त्यामुळेच बनू शकलं. हो पण रीतीपरंपरेनुसार जसं लग्न करतात ते कधी होईल मला माहित नाही. गोष्टी व्यवस्थित जुळून आल्या तर बघू पुढे होईलच आमचं लग्न''. शांतनुनं श्रुतीसोबतच्या आपल्या नात्याचा खुलासा करताना स्पष्ट केलं की,''आम्ही एकमेकांना प्रेरणा देतो,प्रोत्साहन देतो जे खरंतर आमच्या नात्यातलं बलंस्थान आहे. आम्हाला एकमेकांच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टींनी प्रेरणा दिली आहे. मी लकी आहे की मला श्रुती सारखी पार्टनर मिळाली. क्रिएटिव्हिटीच्या बाबतीत आमच्यात खुप साम्य आहे. दरदिवशी नवं काहीतरी सुचणं,नव्या विचाराचा ध्यास असणं आणि एक नवं उद्दिष्टय समोर ठेवणं हे जर तुमच्यासारखंच तुमच्या पार्टनरच्या बाबतीतही घडत असेल तर यापेक्षा आनंद तो काय असावा''.

श्रुती हसन आणि शांतनु हझारिका एकमेकांना २०१८ पासून ओळखत होते. पण कोरोनाच्या काळात दोघे एकमेकांच्या जवळ आले,मैत्री झाली आणि मग एकमेकांना डेट करण्यास त्यांनी सुरुवात केली. मुंबईत ते दोघे सध्या लीव्ह-इन मध्ये राहत आहेत. पण दिवसागणिक आमचं नातं घट्ट बनत चाललंय असं देखील शांतनुनं आपल्या मुलाखतीत नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Narendra Modi: उड्डाणादरम्यान नरेंद्र मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड, ऐन प्रचारादरम्यान विमानतळावरच अडकून पडले!

School Nutrition : शालेय पोषण आहारातील चॉकलेट रस्त्यावर फेकले, निकृष्टता आणि अळ्यांच्या विरोधात कारवाई

Vikramgad Assembly Constituency 2024 : पतीच्या विजयासाठी आमदार पत्नी प्रचाराच्या मैदानात,आघाडीचे ऊमेदवार सुनिल भुसारांचे पारडे जड

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

SCROLL FOR NEXT