siddharth malhotra yodha movie new poster released on 15 march 2024  SAKAL
मनोरंजन

Yodha Siddharth Malhotra: सिद्धार्थ मल्होत्राच्या नवीन सिनेमाचं पोस्टर, या दिवशी 'योद्धा' येणार भेटीला

Devendra Jadhav

Yodha Siddharth Malhotra New Poster: सिद्धार्थ मल्होत्रा सध्या मनोरंजन विश्वात चांगलाच चर्चेत आहे. सिद्धार्थ मल्होत्राच्या आगामी सिनेमाची सध्या चांगलीच उत्सुकता आहे. हा सिनेमा म्हणजे योद्धा.

योद्धा सिनेमाचं जबरदस्त अ‍ॅक्शन पोस्टर आज प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्राचा आजवर कधीही न पाहिलेला अंदाज पाहायला मिळतोय.

योद्धा सिनेमाचं पोस्टर भेटीला

पोस्टरमध्ये सिद्धार्थ एक निडर नायक म्हणून दिसतो. सिद्धार्थच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकतोय. सिद्धार्थ सिनेमात एअरफोर्स अधिकारी म्हणुन दिसतोय.

एक मिशन, एक हायजॅक आणि असंख्य रहस्य असं कॅप्शन देऊन सिद्धार्थचं हे पोस्टर शेअर करण्यात आलंय. सिद्धार्थ 'योद्धा' बनून संकटात सापडलेल्या लोकांना कसं वाचवणार हे सिनेमात पाहायला मिळेल.

सिद्धार्थ मल्होत्राचा 'योद्धा' हा चित्रपट 15 डिसेंबरला रिलीज होणार होता मात्र आता 'डंकी' आणि 'सलार' रिलीज झाल्यानंतर 'योद्धा'ला चित्रपटगृहात चांगला प्रतिसाद मिळेल की नाही याबाबत करण साशंक असल्याच्या चर्चा सुरु असतानाच आता करणने हा सिनेमा येत्या 8 डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली होती. पण सिनेमाची रिलीज डेट पुन्हा बदलली आहे

'योद्धा' हा चित्रपट यापुर्वी 7 जुलै रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र आता योद्धाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. या चित्रपटाची तारीख डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली 15 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार होता.

मात्र आता पुन्हा या चित्रपटाची रिलिज डेट बदलण्यात आली आहे. आता दिग्दर्शक जोडी सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा यांच्या फ्रँचायझीचा पहिला अॅक्शन चित्रपट, आता सिनेमा 15 मार्च 2024 ला प्रदर्शित होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT