Sidhu Moosewala esakal
मनोरंजन

Sidhu Moosewala: "हे मूल कायदेशीर आहे हे सिद्ध करण्यासाठी..."; पंजाब सरकारवर सिद्धू मुसेवालाच्या वडिलांचे गंभीर आरोप

priyanka kulkarni

Sidhu Moosewala: दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसवालाचे (Sidhu Moosewala) वडील बलकौर सिंग (Balkaur Singh)  आणि आई चरण कौर (Charan Kaur) यांनी काही दिवसांपूर्वी एका गोंडस मुलाला जन्म दिला. बलकौर सिंग यांनी त्यांच्या बाळाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. आता नुकताच बलकौर सिंग यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धू मुसेवालाच्या वडिलांनी पंजाब सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

बलकौर सिंग यांनी शेअर केला व्हिडीओ

बलकौर सिंग यांनी नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, "नवजात मुलाच्या आगमनानं आम्ही सुखी असताना सरकार या विषयात ढवळाढवळ करत आहे. सरकारची ही कसली भीती?"

काय म्हणाले बलकौर सिंग?

बलकौर सिंग हे व्हिडीओमध्ये म्हणतात, "वाहेगुरुच्या आशीर्वादाने आमचा शुभदीप काही दिवसांपूर्वी परत आला आहे, मात्र, सरकार मला सकाळपासून त्रास देत आहे. ते मला बाळाची कागदपत्रे देण्यास सांगत आहेत. हे मूल कायदेशीर आहे हे सिद्ध करण्यासाठी ते माझी चौकशी करत आहेत. मला सरकारकडे विनंती करायची आहे, विशेषत: मी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याककडे विनंती करतो की, माझ्या पत्नीचे उपचार पूर्ण होईपर्यंत तुम्ही थांबा. मी इथलाच आहे, तुम्ही मला जेव्हा कॉल कराल तेव्हा मी तुमच्याकडे चौकशीसाठी येईन आणि मी सर्व कायदेशीर कागदपत्रे देईन फक्त माझ्या पत्नीची ट्रीटमेंट आधी पूर्ण होऊद्यात."

बलकौर सिंग यांनी त्यांच्या बाळाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवालाची 29 मे 2022 रोजी हत्या करण्यात आली. या प्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई आणि गोल्डी ब्रार यांच्यासह 25 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या. सिद्धूचे खरे नाव शुभदीप सिंह सिद्धू, असं होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT