Singer KK last marathi song ekant hawa released in Umbrella Marathi Movie Sakal
मनोरंजन

Singer KK Death Anniversary: 'केके'ची आज पहिली पुण्यतिथी आणि त्याचं शेवटचं मराठी गाणं रिलीज झालंय..

गायक केके'च्याअंब्रेला'च्या गाण्याला तुफान प्रतिसाद!

नीलेश अडसूळ

सुप्रसिद्ध गायक केके अर्थात कृष्णकुमार कुन्नथ यांच्या गाण्यांची जादू काय असते, हे आजच्या पिढीला अजिबात पटवून द्यायची आवश्यकता नाही. खऱ्या अर्थानं भाषातीत असं गायन कौशल्य केके यांच्या ठायी होतं. त्यांच्या निधनानंतर अवघ्या देशभरातून व्यक्त होणारा शोक त्यांच्या याच भाषातीत गायन कौशल्याची साक्ष देणारा होता.

मात्र, केके यांनी देशातील इतर अनेक भाषांसोबतत मराठी भाषेतही गाणं गायलं होतं, ही बाब फार थोड्या लोकांना माहिती असावी. त्यांच्या मराठी भाषिक चाहत्यांसाठी खरंतर ही पर्वणी आणि सरप्राईजही ठरावी!

मराठी सिनेरसिकांसाठी हेच सरप्राईज घेऊन येत्या ९ जून रोजी भेटीला येतोय आजच्या पिढीचा 'अंब्रेला' चित्रपट! या चित्रपटाच्या माध्यमातून केके यांचं शेवटचं मराठी गाणं आपल्या भेटीला आलं आहे.

केके यांच्या गायनाचा आवाका खऱ्या अर्थानं देशातील गायनप्रेमी, संगीतप्रेमी रसिकांना आपल्या गायन कौशल्याच्या 'अंब्रेला'खाली घेणारा ठरला. देशातल्या जवळपास ९ भाषांमध्ये केके यांनी गायन केलं.

त्यात हिंदी तर अर्थात आहेच. पण त्यासोबतच, तमिळ, तेलुगु, मल्याळम, आसामी, ओरिया अशा भाषांचा समावेश आहे. आणि आता मराठी भाषेचाही या यादीत समावेश झाला आहे. मराठीत केके यांनी अवघी दोन गाणी गायली आहेत.

त्यातं पहिलं ८ वर्षांपूर्वी २०१४मध्ये आलं होतं. तर दुसरं गाणं थेट आत्ता 'अंब्रेला' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. येत्या ३१ मे रोजी केके यांची पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने 'अंब्रेला'च्या टीमकडून लाडक्या केकेंना ही एक श्रद्धांजलीच ठरावी!

'माचिस'मधल्या छोड आए हम किंवा 'हम दिल दे चुके सनम'मधल्या तडप तडप के या गाण्यांमधून आपल्याला भेटलेल्या केकेंहून 'अंब्रेला'मधून आपल्याला भेटणारे केके फार वेगळे आहेत.

त्यांच्या आवाजातल्या 'एकांत हवा' गण्यातून तरुणाईच्या मनातला उद्वेग अगदी थेट काळजापर्यंत जाऊन भिडतो. चित्रपटाच्या कथानकाला केके (singer KK) यांच्या आवाजातल्या गाण्यामुळे वेगळीच ताकद मिळाली आहे.

मराठी भाषेतलं केके यांनी गायलेलं हे गाणं प्रत्यक्ष चित्रपटाचा भाग म्हणून प्रदर्शित होणारं पहिलं गाणं ठरलं आहे. त्यामुळेच ते एकमेवाद्वितीय ठरलं आहे!

अभिनेता अभिषेक सेठीया आणि अभिनेत्री हेमल इंगळे यांच्यातल्या प्रेमाची केमिस्ट्री प्रेक्षकांना चित्रपटात पाहायला मिळणार आहेच. पण अरुण नलावडे आणि सुहिता थत्ते यांच्या कसदार अभिनयाची मेजवानीही प्रेक्षकांना चित्रपटाचा पुरेपूर आनंद देणारी ठरेल.

चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन, संवाद आणि पटकथा लेखन मनोज विशेंनी केलं आहे. स्वरनादची प्रस्तुत या चित्रपटाची गाणी मंगेश कंगणे यांनी लिहिली असून ती संतोष मुळेकर यांनी संगीतबद्ध केली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT