बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने Shreya Ghoshal २२ मे रोजी मुलाला जन्म दिला. नुकताच तिने मुलासोबतचा पहिला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलं असून त्याचं नावसुद्धा जाहीर केलं आहे. 'देव्यान मुखोपाध्याय' Devyaan Mukhopadhyaya असं श्रेयाच्या मुलाचं नाव आहे. या फोटोमध्ये श्रेया आणि शिलादित्य यांच्यासोबत त्यांच्या चिमुकल्या मुलाची झलक पाहायला मिळतेय. (singer shreya ghoshal posts first picture of her son Devyaan Mukhopadhyaya)
'देव्यान मुखोपाध्यायची ओळख करून देतोय. २२ मे रोजी तो आमच्या आयुष्यात आला आणि आमचं आयुष्य पूर्णपणे बदललं. देव्यानने माझं हृदय प्रेमाने भरून टाकलंय. एक आई आणि बाबाच या भावना खूप चांगल्याप्रकारे समजू शकतात. हे मला अजूनही स्वप्नवतच वाटतंय. आयुष्यातील या भेटीसाठी मी आणि शिलादित्य खूप कृतज्ञ आहोत', अशा शब्दांत श्रेयाने तिच्या भावना व्यक्त केल्या.
मार्च महिन्यात श्रेयाने फोटो पोस्ट करत घरी लवकरच पाळणा हलणार असल्याची गोड बातमी दिली होती. श्रेयाने २०१५ मध्ये प्रियकर शिलादित्य मुखोपाध्यायशी लग्नगाठ बांधली होती. नवी दिल्लीत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला होता. श्रेया तिच्या खासगी आयुष्याविषयी फार व्यक्त होत नाही. त्यामुळे तिच्या लग्नाचे फोटोसुद्धा काही वर्षांनी समोर आले होते.
दूरदर्शनवरील 'सा रे ग म प' या गायनस्पर्धेत श्रेयाने विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर तिने तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. 'देवदास' या चित्रपटासाठी तिने पहिल्यांदा पार्श्वगायन केलं. या चित्रपटातील गायनासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार व फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. वयाच्या चौथ्या वर्षापासूनच श्रेयाने संगीताचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली होती. श्रेयाने हिंदीसोबत इतर भाषांमधीलही अनेक गाणी गायली आहेत. पार्श्वगायनासोबतच ती काही रिअॅलिटी शोजमध्ये परीक्षक म्हणूनही झळकली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.