Sunidhi Chauhan, Sunidhi Chauhan news, Sunidhi Chauhan consert SA
मनोरंजन

Sunidhi Chauhan: कॅन्सर रुग्णांसाठी गायिका पुढे सरसावली... कॉन्सर्टच्या माध्यमातून जमा करणार पैसा

सुनिधी चौहानची गाणी जितकी श्रवणीय आहेत तितकीच ती समाजकार्यात सुद्धा अग्रेसर आहे.

Devendra Jadhav

Sunidhi Chauhan News: गायिका सुनिधी चौहानची गाणी प्रेक्षकांच्या मनाच्या अगदी जवळ. इंडियन आयडॉल फेम सुनिधी चौहानची गाणी प्रेक्षकांना आवडतात. सुनिधी चौहानची गाणी जितकी श्रवणीय आहेत तितकीच ती समाजकार्यात सुद्धा अग्रेसर आहे.

सुनिधीने नुकतीच एक गोष्ट केलीय ज्यामुळे ती सोशल मीडियावर चर्चेत आलीय. सुनिधीने कॅन्सर रुग्णांसाठी एक खास गोष्ट केलीय त्यामुळे तिचं सगळीकडे कौतुक होतंय

(Singer Sunidhi Chauhan steps forward for cancer patients... to raise money through concert)

सुनिधी चौहान ही बॉलीवूडमधील एक आघाडीची आणि लोकप्रिय पार्श्वगायिका आहे. सुनिधीने सध्या सामाजिक कार्य करण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

‘वर्ल्ड नो टोबॅको डे’च्या निमित्ताने २१ मे रोजी कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सुनिधी लाईव्ह म्युझिक फॉर अ कॉज’या संगीत रजनीचे आयोजन करण्यात येणार आहे.

सुनिधी यांच्या या संगीत रजनीतून कर्करोग रुग्णांसाठी निधी संकलन केले जाणार आहे. सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम वांद्रे येथील रंगशारदा येथे पार पडणार आहे.

या माध्यमातून युवकांमध्ये तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल जागृती घडवून आणणे आणि ज्यांनी आपला आवाज गमावला आहे, अशा कर्करोग रुग्णांच्या मदतीसाठी निधी संकलन करणे ही उद्दिष्टे साधली जाणार आहेत.

सुनिधी चौहान आपली लोकप्रिय आणि गाजलेली गाणी ‘सुनिधी लाईव्ह’मध्ये साजरी करणार आहेत. ‘से येस टू लाईफ, से नो टू टोबॅको’ अशा टॅगलाईनसह ही संगीत रजनी साजरी होणार आहे.

‘कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन’ (सीपीएए) ही नोंदणीकृत धर्मादायी संस्था असून ती कर्कग्रस्तांच्या सेवेत गेली ५४ वर्षे कार्यरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT