Ayalaan Esakal
मनोरंजन

Ayalaan: सलमानची दिवाळीही गोड नाहीच! 'टायगर'ला टक्कर देणार 'हा' बहूप्रतिक्षित साउथ चित्रपट..

Vaishali Patil

Sivakarthikeyan Starrer Film Ayalaan: सध्या मनोरंजन विश्वावर साउथ चित्रपट राज्य करित आहेत. साउथ चित्रपटांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांना धुळ चारली आहे. त्यातच आता सध्या बॉक्स ऑफिसवर सलमानचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. मात्र त्यालाही सलमानच्या चाहत्यांशिवाय इतरांनी पाठ फिरवल्याच दिसतय. आता आणखी एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट साउथ इंडस्ट्री घेवुन येत आहे.

आर रविकुमार लिखित आणि दिग्दर्शित, 24AM स्टुडिओजच्या आरडी राजा निर्मित शिवकार्तिकेयनचा काल्पनिक मनोरंजन करणारा आयलान या चित्रपटाची रिलिज डेट समोर आली आहे. या चित्रपटाच्या अधिकृत घोषणेनंतर चाहत्यांमध्ये आनंदाचा वातावरण आहे.

आता KJR स्टुडिओचे कोटपडी जे राजेश यांनी अधिकृतपणे पुष्टी केली आहे की हा चित्रपट यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

ivakarthikeyan Rakul Preet Starrer Film Ayalaan

या प्रकल्पाबद्दल प्रॉडक्शन हाऊसने सांगितले की, 'अयलानसोबत, आम्ही गुणवत्तेशी तडजोड करू इच्छित नाही कारण त्यात एका अखिल भारतीय चित्रपटासाठी सर्वाधिक सीजीआय शॉट्स असतील.

आम्‍हाला कळवण्‍यास आनंद होत आहे की, 'आयलान' हा भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिला लाईव्ह अ‍ॅक्शन चित्रपट असेल, ज्यात 4500 हून अधिक व्हीएफएक्स शॉट्स असतील, ज्यात एलियन पात्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. आयलन तामिळ, तेलुगू, हिंदी, कन्नड आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे.

आयलान हा एक काल्पनिक मनोरंजन आहे ज्यात शिवकार्तिकेयन आणि रकुल प्रीत सिंग मुख्य भूमिकेत आहेत आणि एआर रहमान यांनी संगीत दिले आहे.

करुणाकरन, योगी बाबू, शरद केळकर, ईशा कोप्पीकर, बानुप्रिया, बालसरवनन आणि इतर अनेक स्टार कास्टचा भाग आहेत.

मात्र या दिवाळीला सलमान खानचा 'टायगर 3' हा चित्रपट देखील दिवाळीला रिलिज होणार आहे. दरम्यान सलमानच्या टायगरला आता हा साउथचा 'अयलान' हा चित्रपट भिडणार असं चित्र आता दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT