Smriti Sinha Bhojpuri Actress  esakal
मनोरंजन

Smrity Sinha Bhojpuri Actress : मराठी मध्ये 'स्टार कल्चर' का नाही ? भोजपूरी अभिनेत्रीने सांगितले सिक्रेट!

युगंधर ताजणे

Smrity Sinha Bhojpuri Actress sakal podcast interview : खरं तर भोजपूरी चित्रपट मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना जिंकून घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये स्मृती सिन्हाचं नाव घेतलं जातं. आपल्या परखड वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या स्मृतीनं आता मराठी चित्रपट, मराठी प्रेक्षक आणि मराठी भाषा यावर जे मत व्यक्त केलंय हे चर्चेत आलं आहे.

सकाळच्या अनप्लग्ड पॉडकास्टमध्ये स्मृतीनं तिच्या पुष्कर जोग दिग्दर्शित ' मुसाफिरा ' चित्रपटाविषयी वेगवेगळ्या गोष्टी शेयर केल्या आहेत. त्यात सर्वाधिक उल्लेखनीय गोष्टीविषयी सांगितलं. ती म्हणते मराठी प्रेक्षकांचं मराठी भाषेवर असणारं प्रेम ही खूप कौतुकाची बाब आहे. ते त्यांच्या चित्रपटावर खूप प्रेम करतात. आपल्या भाषेविषयीचा अभिमान काय असावा हे शिकायचं असेल तर ते मराठी प्रेक्षकांकडून शिकावं.

माझ्या एका चित्रपटाचं शुटींग हे लंडनमध्ये सुरु होतं. त्यावेळी दिग्दर्शक पुष्कर जोगच्याही एका चित्रपटाचे शुटींगही सुरु होते. तेव्हा आमची ओळख झाली आणि तिथेच त्यानं मला मराठी चित्रपटात काम करण्याची ऑफरही दिली होती. माझ्यासारख्या भोजपूरी अभिनेत्रीनं मराठी चित्रपटात भूमिका करणे हे अनेकांसाठी गॉसिपिंग होते. त्यांना आयता विषयही मिळाला होता.

सकाळच्या अनप्लग्ड पॉडकास्टवर तुम्हाला स्मृतीनं मराठी चित्रपट विश्वातील अनेक घडामोडींवर स्पष्टपणे काय मत व्यक्त केले आहे ते ऐकता येईल. तिनं भोजपूरी चित्रपटामध्ये सर्वाधिक कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिले जाते यावरही स्मृतीनं मोकळेपणानं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यात तिनं मराठी चित्रपट निर्माते आणि प्रेक्षक यांच्याविषयीचं केलेलं निरीक्षण जास्त महत्वाचं आहे.

भोजपूरी अभिनेत्री म्हणून भलेही स्मृतीनं तिच्या नावाची वेगळी छाप उमटवली असेल पण आता तिनं मराठी चित्रपटांमध्ये इंट्री करुन मराठी प्रेक्षकांविषयी सांगितलेल्या त्या गोष्टीनं लक्ष वेधून घेतले आहे. त्या विधानाची चर्चाही होत आहे. तिची ही मुलाखत पूर्ण ऐकण्यासाठी सकाळच्या अनप्लग पॉडकास्टला क्लिक करा आणि स्मृती काय म्हणाली ते एकदा ऐकाच!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: नऊ दिवसांनंतर मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित; मराठा समाजाला केलं 'हे' आवाहन

ICC Rankings: ऋषभ पंतने पुनरागमन गाजवलं! कसोटी क्रमवारीतही विराट-रोहितलाही मागे टाकत टॉप-१० मध्ये मिळवलं स्थान

Farida Jalal : "है कौन ये फटकरी ?" , पहिल्यांदा आयुष्याच्या जोडीदाराला भेटल्या तेव्हा अशी होती फरीदा जलाल यांची प्रतिक्रिया

Akshay Shinde Encounter : 'देवाभाऊचा न्याय' ते विधानसभा निवडणूक... अक्षय शिंदेच्या वकिलाचा हायकोर्टात खळबळजनक दावा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात मनसे करणार आंदोलन

SCROLL FOR NEXT