मुंबई : पुण्यातील आपल्या भाषणाच्या चुकीच्या बातमीनं गोधळ घातल्याचं सांगत सुबोध भावेनं नवी फेसबूक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं या भाषणाचा संपूर्ण व्हिडिओ टाकला असून माझं संपूर्ण भाषण पाहिल्यावर जर तुम्हाला वाटलं की माझं चुकलं तर मी मनापासून क्षमा मागतो, असं त्यानं म्हटलं आहे. (so I sincerely apologize Subodh Bhave explanation on previous statement)
सुबोध आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हणतो, काल माझ्या एका भाषणाच्या चुकीच्या बातमीनं जो काही गोंधळ घातला आहे, त्याचा हा संपूर्ण व्हिडिओ. (कुठेही कट न करता जसाच्या तसा) आपण या व्हिडिओमध्ये जे काही आणि ज्या अर्थाने बोललो त्याची जबाबदारी आपण घ्यावी या मताचा मी आहे.
पण जो अर्थच माझ्या बोलण्याचा नव्हता आणि तो जर चुकीच्या पद्धतीने बातमीदार पोचवत असतील तर त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांचीच. माझं संपूर्ण भाषण पाहिल्यावर जर तुम्हाला वाटलं की माझं चुकलं तर मी मनापासून क्षमा मागतो. पण त्या आधी एकदा 'संपूर्ण भाषण' त्याच्या अर्थासहित बघा तर एकदा.
सुबोध भावेच्या भाषणाबाबत वृत्त काय होतं?
सध्याच्या राजकारणावर अभिनेता सुबोध भावे यांनी चांगलेच ताशेरे ओढले आहेत. लायकी नसलेल्यांच्या हाती आपण देश दिला असल्याची खंत सुबोध भावेनं व्यक्त केली होती. तसंच आपण सगळे चांगलं शिक्षण घेऊन परदेशी स्थायिक कसं होता येईल, याचाच विचार करत असल्याचं सुबोधनं म्हटलं होतं.
पुण्यातल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस प्री प्रायमरी स्कूलतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सुबोध भावे बोलत होते. आपण सगळे चांगलं शिक्षण घेऊन सतत करियरच्या मागे धावत आहोत. मला चांगली नोकरी कशी मिळेल, परदेशी जाऊन स्थायिक कसं होता येईल, याचाच विचार आपण करत आहोत. ज्या राजकारण्यांची लायकी नाही, अशांच्या हातात आपण देश उभारणीचं काम दिलं आहे, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.