Shatrughan Sinha’s children Sonakshi Sinha and Luv Sinha have reacted to his election victory on Saturday. Google
मनोरंजन

शत्रुघ्न सिन्हा यांनी 'भाजप'ला नमवल्याचा आनंद सोनाक्षीच्या पोस्टमधनं दिसला

पश्चिम बंगालच्या आसनसोल मधील लोकसभेच्या जागेसाठी तृणमुल क्रॉंगेसचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांचा मोठ्या फरकानं विजय झाला आहे.

प्रणाली मोरे

पश्चिम बंगालच्या आसनसोल लोकसभेच्या जागेसाठी तृणमुल क्रॉंगेसचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha)यांच्या दणदणीत विजय झालेला आहे. त्यांनी भाजपाच्या अग्निमित्र पॉल यांना ३ लाख मतांच्या फरकानं हरवलं आहे. यामुळे शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा(Sonakshi Sinha) हिनं आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर वडीलांच्या विजयाची बातमी देणारी पोस्ट करत इतक्या मोठ्या फरकानं वडील जिंकून आले म्हणून त्यांचं अभिनंदन करणारी पोस्ट केली आहे. सोनाक्षीनं पहिल्या पोस्टमध्ये वडील किती मतांनी विरोधी उमेदवारापेक्षा पुढे आहेत हे सांगताना ८४,००० मतांचा फरक सांगितला होता. तिनं 'yay' शब्द लिहीलेला एक स्टिकर तिथे पोस्टवर जोडला होता. सोनाक्षीनं ती पोस्ट भाऊ लव सिन्हा आणि वडील शत्रुघ्न सिन्हा यांना समर्पित केली आहे. तिनं त्या दोघांनाही आपलं प्रेरणास्थान मानलं आहे. आणि आसनसोलच्या लोकांचे आभारही मानले आहेत.

sonakshi SInha Post for her dad's victory

सोनाक्षीचा भाऊ लवने देखील वडीलांसाठी लिहीलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, ''मी माझ्या वडीलांच्या पक्षात नाही. पण मला माहिती आहे,माझ्या वडिलांनी अशा ठिकाणी विजय मिळवला आहे जिथे भाजपाचं अस्तित्व मिटवणं कठीणच नाही असंभव होतं. माझे वडील आपल्या आयुष्यात एका नव्या वाटेवरनं प्रवास करीत आहेत,आणि तिथं त्यांना विजय मिळणं हे खरंच अविश्वसनीय आहे. माझे वडील माझी प्रेरणा होते आणि कायम राहतील. मी आसनसोलचे नागरिक,तृणमुल कॉंग्रेसचे कार्यकर्ता,नेते आणि ममना बॅनर्जी यांचा आभारी आहे''.

सोनाक्षीनं आपल्या भावाची पोस्ट शेअर करीत लिहिलं आहे,''आणि विजेते आहेत...;''. आपल्या तिसऱ्या पोस्टमध्ये सोनाक्षीनं आपल्या वडीलांनी कसा रेकॉर्ड करणारा विजय मिळवला आहे यावर प्रकाशझोत टाकला आहे.

सोनाक्षीनं २०१० मध्ये सलमान खानसोबत 'दबंग' सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यासाठी तिला पदर्पणाचा बेस्ट डेब्यू फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. त्यानंतर 'दबंग २' आणि 'दबंग ३' सिनेमातही ती दिसली होती. सोनाक्षीनं 'लुटेरा','बुलेट राजा','हिम्मतवाला','तेवर','अकिरा' सारख्या अनेक वेगळ्या धाटणीच्या सिनेमातूनही काम केलं आहे. लवकरच ती हुमा कुरेशीसोबतही एका सिनेमात दिसणार आहे. मराठी दिग्दर्शक आदित्य सरपोतदारच्या 'काकुडा' सिनेमातही ती दिसणार आहे. या सिनेमात सोनाक्षीसोबत रितेश देशमुख(Riteish Deshmukh) आणि साकिब सलीमही दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT