Sonalee Kulkarni speaks about amruta Khanvilkar in Bus Bai Bus Show. Instagram
मनोरंजन

'आम्ही मैत्रिणी बनलो असतो पण...',अमृताविषयी सोनाली जरा स्पष्टच बोलली

सोनाली कुलकर्णी आणि अमृता खानविलकर यांच्यात 'नटरंग' पासून वैर सुरू झालं असं बोललं जातं.

प्रणाली मोरे

Sonali Kulkarni: झी मराठीवरील 'बस बाई बस' कार्यक्रमात नुकत्याच झालेल्या भागात सोनाली कुलकर्णी गेस्ट म्हणून हजर झाली होती. तिच्यावर काही स्फोटक प्रश्नांचा हल्लाबोल सुबोध अन् त्याच्या बसमधील महिला प्रवाशांनी केला,त्यातला एक प्रश्न म्हणजे सोनाली आणि अमृता खानविलकर यांच्यात वैर की मैत्री?

अर्थात हा प्रश्न सुबोध आणि टीमनं थेट केला नाही,तर कार्यक्रमात एका भागात आलेल्या गेस्ट कलाकारांना एक फोटो दाखवला जातो ज्यावर त्यांना खरंखरं मनातलं बोलायचं असतं. झालं तिथच संधी साधून सोनालीला अमृताचा फोटो दाखवला गेला अन् सोनालीला सगळं खरंखरं सांगावं लागलं.(Sonalee Kulkarni speaks about amruta Khanvilkar in Bus Bai Bus Show.)

अमृताचा फोटो पाहिल्यावर सोनालीनं जरी गुडी-गुडी सुरुवात केली असली तरी दोन-तीन वाक्य ती अशी खरंखरं बोलून गेली ज्यावरनं स्पष्ट होतं की दोघींमध्ये वैर टोकाचं नसलं तरी मैत्री नावालाही नाही. सोनाली म्हणाली,''लोकांनी आम्ही वैरीणी आहोत हे पसरवलं. पण आमच्यातही काही फार मैत्री वगैरे नाही. हो,पण ती होऊ शकली असती जर आम्ही एकत्र सिनेमा केला असता. पण तसं काही आमच्या बाबतीत घडलं नाही आणि आज दोघीही इतके वर्ष इंडस्ट्रीत आहोत पण आमच्यात मैत्री वगैरे नाही''.

सुबोध भावे सूत्रसंचालक असलेल्या कार्यक्रमात आजपर्यंत विविध क्षेत्रातील अनेक कर्तबगार महिला पाहुणचार अनुभवताना स्फोटक विधानं करुन गेल्यात. त्यातले पंकजा ताई मुंडे आणि महापौर किशोरीताई पेडणेकर यांचे एपिसोड खूप गाजले. आता सोनाली कुलकर्णीनं अमृताविषयी काही स्पष्ट विधानं करुन त्या पंक्तीत आपली जागा पटकावली आहे. आता सोनालीच्या वक्तव्यांवर अमृता खानविलकर काही उत्तरं देते का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT