Sonam Kapoor UK Top 40 : आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाईल अन् फॅशनसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रींमध्ये सोनम कपूरचे नाव घेतले (Sonam Kapoor Latest news) जाते. तिच्या या फॅशन सेन्सचा आता जागतिक पातळीवर गौरव झाला आहे. यापूर्वी जगभरातील वेगवेगळ्या फॅशन महोत्सवामध्ये सोनमनं तिच्या नावाची ओळख तयार केली आहे.
आता सोनमचं नावं हे युकेच्या टॉप ४० बेस्ट ड्रेसमध्ये आलं आहे. यामध्ये (Sonam Kapoor Top UK 40 List) तिच्या सह हॅरी स्टाईल्स, केट मॉस अन् केट मिडलटन हे सेलिब्रेटी देखील आहेत. सोनम कपूर ही एक जागतिक फॅशन आणि लक्झरी आयकॉन आहे, सोनम ला पाश्चिमात्य लोक भारताची (Sonam Kapoor Viral news) सांस्कृतिक राजदूत म्हणून ओळखतात. तिनं तिच्या फॅशन अन् स्टाईलनं भारतातील फॅशन विश्वाला देखील जागतिक पातळीवर प्रकाशझोतात आणलं आहे.
जगातील सर्व प्रमुख जागतिक फॅशन आणि लक्झरी ब्रँड्सवर सोनम कपूरचा तिचा असणारा जबरदस्त प्रभाव हा तिच्या सोशल मीडियावरील फोटोंतून दिसून आले आहे. आंतरराष्ट्रीय मीडियाने वारंवार मान्य केला आहे! आता सोनमविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. यूकेच्या प्रतिष्ठित मीडिया हाऊस द स्टँडर्डने सोनम कपूरला यूकेच्या टॉप ४० सर्वोत्कृष्ट ड्रेस्ड एक म्हणून गौरवलं आहे.
यावेळी तिच्या नावाचा समावेश हा यूके फॅशनमधील काही प्रतिष्ठित सेलिब्रेंटीमध्ये करण्यात आला आहे. त्या सेलिब्रेटींची जगभरातील फॅशन विश्वावर मोठी छाप पाडली आहे. सोनम, हॅरी स्टाइल्स, केट मिडलटन, रोसामुंड पाईक, केट मॉस, सिएना मिलर, बियान्का जॅगर, अलेक्सा चुंग, स्टॉर्मझी, नाओमी कॅम्पबेल, एडवर्ड एनिनफुल, स्टेला मॅककार्टनी, फोबी फिलो, अक्षता मूर्ती (व्यावसायिक आणि पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी) यांना टॉप 40 यादीत स्थान मिळाले आहे.
जागतिक फॅशन अहवालानुसार, सोनम झेंडया, काइली जेनर, केंडल जेनर, ब्लॅकपिंक, बीटीए या सेलिब्रिटींच्या यादीमध्ये होती ज्यांनी 2023 मध्ये लक्झरी फॅशन ब्रँडसाठी सर्वाधिक गौरव प्राप्त केला होता. सोनमच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास तिच्याकडे दोन मोठे प्रोजेक्ट आहेत, त्यात बॅटल ऑफ़ बिटोराची सर्वाधिक चर्चा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.