Sonu Nigam Speaks On Bonding With Anu Malik And Says AR Rahman  esakal
मनोरंजन

Sonu Nigam : सोनु निगमनं ऑस्कर विजेत्या रहमानच्या गाण्याला म्हटलं 'बेकार', अनु मलिकवर केलं खास वक्तव्य!

भारताच्या ज्या संगीतकार आणि गायकानं संगीतामधील पहिलं ऑस्कर मिळवून दिलं त्या ए आर रहमान यांच्या नावाची क्रेझ काही औरच आहे.

युगंधर ताजणे

Sonu Nigam Speaks On Bonding With Anu Malik And Says AR Rahman : भारताच्या ज्या संगीतकार आणि गायकानं संगीतामधील पहिलं ऑस्कर मिळवून दिलं त्या ए आर रहमान यांच्या नावाची क्रेझ काही औरच आहे. त्यांना फॉलो करणाऱ्या तरुणाईची संख्या मोठी आहे. केवळ भारतच नाहीतर जगाच्या पाठीवर त्यांचा चाहतावर्ग आहे. अशातच त्यांच्यावरील टीकेची बातमी चर्चेत आली आहे.

सोनु निगम हा प्रसिद्ध गायक. तो त्याच्या आगळ्या वेगळ्या शैलीतील गायकीसाठी ओळखला जातो. त्यानं एका मुलाखतीमध्ये रहमान यांच्यावर शेलकी टिप्पणी केली आहे. यावेळी त्यानं रहमान यांनी एक कंपोझ केलेल्या गाण्याविषयी भाष्य करत ते गाणं रहमान यांनी अशाप्रकारे का कंपोझ केलं असेल, असा प्रश्नही त्यांना विचारला आहे. सोनुनं रहमान यांच्यावर टीका करणे हे अनेकांना आवडलेलं नाही.

रहमान आणि अनु मलिक हे त्यांच्या वेगळ्या शैलीतील कंपोझिंगसाठी ओळखले जातात. बॉलीवूड इंडस्ट्रीमधील दोघेही मोठे संगीतकार असून सोनूनं त्या दोघांवरही केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. सोनूनं रहमान यांच्या त्या गाण्याला बेकार असे म्हटले आहे. दुसरीकडे अनु मलिक यांच्यासोबतच्या मैत्रीविषयी काही खुलासे केले आहेत. एफ एम स्टेशनवरुन बोलताना सोनूनं म्हटले आहे की, रहमान यांनी ब्ल्यू चित्रपटावरुन रहमान यांच्यावर टीका केली आहे.

सोनु म्हणतो की, ब्ल्यू चित्रपटातील चिगी वीगी हे गाणं रहमान यांनी कंपोझ केलं होतं. ते खूपच बेकार होते. भलेही ते गाणं त्यावेळी खूप प्रसिद्ध झाले असेल पण ते फार सुश्राव्य असे नव्हते. मला ते गाणं अजिबात आवडले नव्हते. त्यावेळी त्यांनी त्या गाण्यासाठी ज्या इंटरनॅशनल पॉप आयकॉनच्या निवडीबाबतही चूक केली होती. सोनू म्हणतो हे गाणं मी देखील गायले होते.

यानंतर बॉलीवूड हंगामसोबत बोलताना सोनू निगमनं म्हटले आहे की, अनु मलिक यांना मी जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा मला त्यांची खूपच भीती वाटली होती. मी तेव्हा नवीन होतो. अनु मलिक यांच्याकडे खूप साऱा अनुभव होता. आणि त्यामुळे त्यांची भीती वाटत असे. माझे वय तेव्हा १४ वर्षांचे होते. माझे वडील मला अनु मलिक यांच्याकडे घेऊन गेले होते.

मी अनु मलिक यांच्याकडून खूप काही शिकलो. ते माझे या क्षेत्रातील गुरु आहेत. हे मला विसरुन चालणार नाही. त्यांचा स्वभाव थोडासा वेगळा आहे. एकदा ही तुम्ही त्यांच्याशी चांगला संवाद साधला की, त्यानंतर मग ते तुमच्याशी छानपैकी बोलू लागतात. अशीही आठवण सोनूनं यावेळी सांगितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

Latest Maharashtra News Updates : १०० टक्के मतदान करण्याच्या उद्देशानं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं वोट फॉर रन मॅरेथॉनचं आयोजन

Winter Health : पौष्टिक आहारच वाढवेल प्रतिकारशक्ती

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' दाव्यावर शरद पवारांचा पलटवार, म्हणाले- त्यांनी माझं स्थान ओळखलं पाहिजे

SCROLL FOR NEXT