मुंबई - कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्याला सामोर जाताना प्रशासकीय पातळीवरुन प्रयत्न केले जात आहे. आता यासगळ्या प्रक्रियेत बॉलीवूडचे सेलिब्रेटीही सहभागी झाले आहेत. प्रसिध्द अभिनेता सोनु सुदकडे मदतीसाठी एक दोन नव्हे तर ४० हजार रिक्वेस्ट (40 Thousand Request) आल्या आहेत. त्यावर त्यानं सोशल मी़डियावर जी प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळे तो पुन्हा एकदा प्रसिध्दीच्या झोतात आला आहे. अभिनेता सोनु सुद (Sonu Sood) हा त्याच्या मदतशील स्वभावासाठी ओळखला जातो. आतापर्यत त्यानं मोठ्या प्रमाणावर लोकांना मदत केली आहे.
कोरोनाच्या काळात लोकांना मदत हवी आहे. तशा वेगवेगळ्या प्रकारच्या सुचना सध्या सोशल मीडियावरुन (Social Media) व्हायरल होत आहे. सोनुकडे अशा ४० हजार रिक्वेस्ट आल्या आहेत. या सगळ्यांना मदत करायची झाल्यास किमान मला १४ वर्षे लागतील असे त्यानं सांगितले आहे. सोनुची (Sonu Sood) ती पोस्ट व्हायरल झाली आहे. कोरोनाचा मोठा फटका देशाला बसला आहे. सध्या अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढत असल्यानं लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. अशावेळी सर्वसामान्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे.
कोरोनाग्रस्तांना हॉस्पिटल्समध्य़े बेड मिळत नाहीये. ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता आहे. त्यावर सोनुनं (Sonu Sood) म्हटलं आहे की, एकाचवेळी सर्वांना मदत करणं शक्य नाही. लोकं मदत मागण्यास मागे पुढे पाहत नाहीत. मात्र त्यांना मदत करण्यासाठी जी आवश्यक सामुग्री जवळ असावी लागते ती आपल्याकडे आहे का याचा अंदाजही घ्य़ावा लागतो. ज्यावेळी माझ्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात मदतीसाठी रिक्वेस्ट आल्या तेव्हाच मला त्या पूर्ण करता येणार नाही याची जाणीव झाली होती.
सोनुनं सोशल मीडियावर लिहिलं आहे की, मला जवळपास ४१ हजार ६६० मदतीसाठी रिक्वेस्ट आल्या आहेत. त्यांना मदत करण्याचा प्रयत्न मी करतच आहे. जर मला या सगळ्यांपर्यत जायचे असेल तर मग १४ वर्षांचा कालावधी लागेल असंही तो यावेळी म्हणाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.