मुंबई - कोरोनाचा वाढणारा कहर यामुळे मनोरंजन क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. कोरोनाचा प्रभाव वाढत असल्यानं त्याचा परिणाम जाणवत आहे. बॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेता सोनु सूदनं (Sonu Sood) दिल्ली आणि महाराष्ट्रमध्ये ऑक्सिजनचे चार प्लांट उभारणार असल्याची माहिती आहे. याविषयी अधिक माहिती देताना सोनुनं सांगितलं की, ऑक्सिजनची चिंता वाढू लागली आहे. तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपल्याला पुढाकार घ्याव्याच लागेल.
ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहे. सध्या कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस आणखी घट्ट होताना दिसत आहे. सोनुनं सांगितलं आहे की, लोकांच्या जीवाची काळजी आहे. त्यांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी जे काही करता येईल ते करावं लागेल. याशिवाय सोनु आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. ते म्हणजे त्यानं भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगची (Harbhajan Singh) मदत केली आहे. त्याला रेमडेसिव्हिर इंजेक्शन हवं होतं. ते सोनुनं मिळवून दिलं आहे. त्यामुळे त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे.
लोकांना मदत करण्यासाठी सोनु नेहमी तयार असतो. ती त्याची वेगळी ओळख आहे. त्यानं आतापर्यत आपल्या सामाजिक उपक्रमांनी अनेकांची मनं जिंकून घेतली आहे. हरभजननं कर्नाटकमधील एकासाठी रेमडेसिव्हिर हवं असल्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. त्यानंतर त्याला चाहत्यांनी प्रतिसाद देण्यास सुरुवात झाली. त्या पोस्टला सोनुनं तात्काळ प्रतिसाद दिला आणि त्याच्या मदतीला धावून गेला.
सोनुच्या मदतीला प्रतिक्रिया देताना हरभजननं लिहिलं आहे की, भावा, तुझी मदत मिळाली. तुझ्या मदतीसाठी तुला मनपूर्वक धन्यवाद. देवासारखा तु धावून आला होता. देव तुला आणखी बळ देवो. अशाप्रकारे त्यानं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हरभजननचं ते व्टिट वेगानं व्हायरल झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.