actor sonu sood Team esakal
मनोरंजन

महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना सोनू सूदचा मदतीचा हात; गावांमध्ये पोहोचवणार साहित्य

स्वाती वेमूल

काही दिवसांपूर्वी कोकणासहीत Kokan महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती निर्माण झाली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण, महाड, या ठिकाणी घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. राज्यभरातून पूरग्रस्त भागात मदत पोहोचवली जात आहे. आता अभिनेता सोनू सूद Sonu Sood पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. चिपळूण, महाड आणि इतर काही भागात मदतीचे पॅकेज सोनूच्या संस्थेकडून पाठवले जाणार आहेत. "पुरामुळे प्रभावित झालेली गावं ही प्रमुख महामार्गांपासून २०-३० किलोमीटर दूर आहेत. याठिकाणी फारशी मदत पोहोचू शकली नाही. या गावांच्या सरपंचांशी आम्ही संपर्क साधला आणि तिथल्या लोकांसाठी गरजेचे सामान आणि खाद्यपदार्थ पाठवले जाणार आहेत. ही मदत माझी टीम गावापर्यंत पोहोचवेल", असं सोनूने सांगितलं. सोनू सूदच्या संस्थेकडून एक हजारहून अधिक घरांना ही मदत दिली जाणार आहे.

पूरग्रस्त गावांमध्ये मदतीचं साहित्य वितरित करणं मुख्य उद्दिष्ठ असल्याचं सोनूने यावेळी सांगितलं. "माझी टीम प्रत्येक गरजू व्यक्तीला मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. जेणेकरून नैसर्गिक आपत्तीला तोंड देऊन ही गावं पुन्हा एकदा आपल्या पायावर उभे राहू शकतील", असं त्याने सांगितलं.

सुनिल शेट्टीचीही मदत

कोकणात अनेक शहरं पाण्याखाली गेली आहेत. रायगड आणि रत्नागिरीमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. भारताचे नागरिक म्हणून आपण कोकणवासियांच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, अशी भावना सुनील शेट्टीने व्यक्त केली आहे. 'सेंटर फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया' या सामाजिक संस्थेसोबत मिळून कोकणासाठी मदत करणार असल्याची माहिती त्यांने या माध्यमातून दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: निकाल त्यांच्या बाजूने लागत नाही तेव्हा... निवडणूक जाहीर होताच एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा, काय म्हणाले?

Priyanka Gandhi: अखेर प्रियांका गांधी निवडणुकीच्या रिंगणात! पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर; वायनाडची जागा काँग्रेस राखणार का?

Baba Siddique Murder Case : वरातीत हवेत गोळीबार हाच मारेकऱ्याचा अनुभव... बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा

Sports News on 15th October 2024: भारतीय संघाचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात ते कोल्हापूरच्या कन्येने जिंकले रौप्यपदक

Assembly Election: दोन वर्षांपासून गुजरात महाराष्ट्राला चालवत होता, आता जनताच न्याय करणार; मशाल धगधगणार! आदित्य ठाकरेंनी दंड थोपटले

SCROLL FOR NEXT