Sooraj Pancholi Trolled: 'गजनी' सिनेमाची अभिनेत्री जिया खान हिनं ३ जून,२०१३ रोजी आपल्या जुहू येथील घरात आत्महत्या केली होती. तिची आई राबियानं सूरज पांचोली वर आपल्या मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. पण १० वर्षांनी सीबीआय च्या विशेष न्यायालयानं या प्रकरणात सूरज पांचोलीची २८ एप्रिल रोजी पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली.
याचा आनंद व्यक्त करताना सूरज पांचोलीनं मिठाई वाटली आणि त्यानंतर तो गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी सिद्धिविनायक मंदिरात पोहोचला. पण त्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका केली जात आहे. चला जाणून घेऊया याविषयी सविस्तर. (Sooraj Pancholi holding lord ganesha photo after touching his shoes..netizens trolled actor)
कोर्टानं सूरज पांचोलीला पुराव्यांअभावी सोडलं.. कोर्टानं जिया खान प्रकरणात तो दोषी नसल्याचा निकाल दिला, आणि या निर्णयानंतर अभिनेत्यानं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे आणि लिहिलंय की,''अखेर सत्याचा विजय झाला''.
एवढंच नाही तर त्यानं मीडियाला मिठाईचं वाटप केलं आणि त्यानंतर सिद्धिविनायक मंदिरातही तो गेला. भले तो आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात गेला असेल आणि देवाचे आभार मानले असतील पण त्याला लोकांनी मात्र चांगलंच झापलं आहे.
सूरज पांचोलीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे,जिथे त्याच्या हातात गणपतीचा एक फोटो दिसत आहे आणि तो पापाराझीला फोटोसाठी पोझ देत आहे. यादरम्यान त्यानं आपल्या पायातील बूटांना हात लावल्यानंतर गणपतीच्या फोटोला स्पर्श केल्याचं दिसलं. त्यामुळे आता लोकांनी त्याला अतिशय वाईट पद्धतीनं ट्रोल केल्याचं दिसत आहे.
त्यानं चप्पलला हात लावल्यानंतर आधी हात धुवायला हवे होते आणि त्यानंतर देवाचा फोटो हातात पकडायला हवा होता असं लोक म्हणताना दिसत आहेत. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे,'यानं बूटांना हात लावल्यावर देवाच्या फोटोला स्पर्श केला.कशाला जातात मंदिरात असे लोक ज्यांना काही माहित नसतं''.
सूरजनं ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की,''आज माझ्यातील एका नवीन माणसाचा जन्म झाला''. त्यानं जियासोबतचे संबंध आणि तिच्यासोबत झालेली दुर्घटना याविषयी देखील मोकळेपणानं भाष्य केलं.
तो म्हणाला,''जियासोबत जे झालं ते खूपच वाईट होतं. पण हे सगळं माझ्या कंट्रोलच्या बाहेरचं होतं. तिला माझ्यापेक्षा जास्त तिच्या कुटुंबाची अधिक गरज होती त्यावेळी. तिला आपल्या बॉयफ्रेंडच्या पाठिंब्यापेक्षा आपल्या कुटुंबाच्या प्रेमाची आणि पाठिंब्याची गरज होती''.
''मी जेमतेम तिला तेव्हा फक्त ५ महिन्यांपासून ओळखत होतो. मी त्यावेळी जे माझ्याकडून करता येईल तिच्यासाठी त्या सगळ्या गोष्टी केल्या''.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.