Sophia Leone esakal
मनोरंजन

Sophia Leone: अडल्ट फिल्म स्टार सोफिया लिओनचे वयाच्या 26 व्या वर्षी निधन; अपार्टमेंटमध्ये आढळला मृतदेह

priyanka kulkarni

Sophia Leone: अडल्ट फिल्म स्टार सोफिया लिओनीचे (Sophia Leone) निधन झाले आहे. वयाच्या 26 व्या वर्षी तिनं अखेरचा श्वास घेतला आहे. रिपोर्टनुसार, आठवडाभरापूर्वी ती तिच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळली होती. सोफियाच्या कुटुंबीयांनी फोनवर तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना तिच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. सोफियाचे सावत्र वडील माईक रोमेरो यांनी सोफियाच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला आहे. सोफियाच्या मृत्यूचा सध्या तपास सुरु आहे.

कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोफिया काही दिवसांपासून तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय होती, जिथे तिने काही पोस्ट अपलोड केल्या होत्या. सोफियाच्या सावत्र वडिलांनी सांगितलं की, "सोफियाच्या आई आणि कुटुंबाच्या वतीने, मला आमच्या प्रिय सोफियाच्या निधनाची बातमी तुम्हा सर्वांना सांगायची आहे. सोफियाच्या आकस्मिक मृत्यूने तिच्या कुटुंबावर आणि मित्रांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला आहे."

"1 मार्च 2024 रोजी सोफियाचे कुटुंब तिच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते पण त्याला ती प्रतिसाद देत नव्हती. सोफियाच्या मृत्यूचा तपास सध्या स्थानिक पोलिसांकडून करत आहेत. सोफिया ही एक चांगली मुलगी, बहीण, नात, भाची आणि मैत्रिणी होती. तिला प्राण्यांची आवड होती. तसेच तिला फिरायला आवडायचे.", असंही सोफियाच्या सावत्र वडिलांनी सांगितलं.

अडल्ट फिल्म स्टार्सचे निधन

तीन महिन्यांच्या कालावधीत, अडल्ट चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या मृत्यूंमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. याआधी कागनी लीने वयाच्या 36 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिनं आत्महत्या केली. तसेच जानेवारी महिन्यामध्ये जेसी झेन ही तिचा प्रियकर ब्रेट हसनम्युलरसह ओक्लाहोमामध्ये मृतावस्थेत आढळून आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT