Oh Young soo esakal
मनोरंजन

Oh Young soo: स्क्विड गेम फेम 79 वर्षाच्या अभिनेत्याला तुरुंगवास; लैंगिक गैरवर्तन प्रकरणात आढळला दोषी

Oh Young soo: 79 वर्षीय ओह यंग सो हे लैंगिक गैरवर्तनाप्रकरणी दोषी आढळल्याची बातमी समोर येत आहे. त्यांना 8 महिने तुरुंगवास आणि 2 वर्षांचा प्रोबेशन सुनावण्यात आला आहे.

priyanka kulkarni

Oh Young soo: नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 'स्क्विड गेम' (Squid Game) या वेब सीरिजला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. जगभरातील प्रेक्षकांनी या वेब सीरिजचं कौतुक केलं. या वेब सीरिजमधील अभिनेता ओह यंग सो (Oh Young-soo) यांच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले. अशताच आता ओह यंग सो हे सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. 79 वर्षीय ओह यंग सो हे लैंगिक गैरवर्तनाप्रकरणी दोषी आढळल्याची बातमी समोर येत आहे. त्यांना 8 महिने तुरुंगवास आणि 2 वर्षांचा प्रोबेशन सुनावण्यात आला आहे. ओह यंग सो यांना एक वर्षाची शिक्षा होऊ शकते, असं म्हटलं जात होतं, पण आता कोर्टाचा अंतिम निकाल आला आहे.

8 महिने तुरुंगवास आणि 2 वर्षे प्रोबेशन

रिपोर्टनुसार, Suwon District Court च्या द सेओंगनाम शाखेने अभिनेता ओह यंग सो यांना शिक्षा सुनावणी आहे. ओह यंग सो यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिला ट्रायलनुसार, ओह यंग सोला 8 महिने तुरुंगवास आणि 2 वर्षे प्रोबेशन मिळाले. यासोबतच ओह यंग सो यांना जेलमध्ये सेक्शुअल वॉयलेंस ट्रीटमेंट प्रोग्राम दिला जाणार आहे. जेव्हा एका पत्रकाराने या प्रकरणाबद्दल ओह यंग सो यांना विचारले की, "आपण यापुढे न्यायालयात अपील करणार का?", तेव्हा ते म्हणाले,"होय, मी नक्कीच तसे करेन."

2017 चे प्रकरण

2017 मध्ये ओ यंग सू यांच्यावर एका महिलेसोबत जबरदस्ती केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी 2021 मध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील पिडीत महिलेने सुवॉन जिल्हा अभियोक्ता कार्यालयाकडे या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन केले. महिलेने सांगितले की, ती ओह यंग सोसोबत एका थिएटर टूरवर होती, तेव्हा ओ यंग सू जबरदस्तीने तिचे चुंबन घेतले आणि तिला जवळ ओढले होते. या प्रकरणात अभिनेत्याला 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 15 मिलियनचा दंड ठोठावण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. पण नंतर गेल्या महिन्यात बातमी आली की ओ यंग सू यांना एक वर्षासाठी तुरुंगात पाठवले जाईल. आता ओ यंग सू यांना फक्त 8 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

'स्क्विड गेम' या वेब सीरिजमध्ये काम केलं. पण या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये ते दिसणार नाहीत. ओह यंग सो दक्षिण कोरियाचे दिग्दर्शक वू सेओक यांग यांच्या आगामी 'बिग फॅमिली' चित्रपटात देखील ते दिसणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT