Subhash Chandra Bose Grand Nephew Rubbishes Claims In Randeep Hooda Swatantrya Veer Savarkar viral  Esakal
मनोरंजन

Swantantrya Veer Savarkar Controversy: चुकीचा इतिहास दाखवणं हा गुन्हा! सुभाषचंद्र बोस अन् सावकरांचा संबध दाखवल्यानं बोस यांचे नातू भडकले

Vaishali Patil

अभिनेता रणदीप हुड्डा सध्या त्याच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर'या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात रणदीपने सावरकरांची साकारली आहे. त्याचबरोबर तो या चित्रपटाच दिग्दर्शनही करत आहे.

वीर सावरकर यांच्या 140 व्या जयंतीनिमित्त म्हणजेच 28 मे रोजी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. जो खुप व्हायरल देखील झाला. मात्र आता या टिझर वादात सापडला आहे. काही लोकांनी त्याच्या चित्रपटाला विरोधही सुरू केला आहे.

रणदीप त्याच्या चित्रपटातून सत्याचा विपर्यास करत आहे. ज्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबाच्या नावाचाही समावेश आहे. टीझरमध्ये केलेल्या विविध दाव्यांवर नेताजींचे नातू चंद्र कुमार बोस आक्षेप घेतला आहे.

टीझरमध्ये रणदीप हुड्डा यांनी वीर सावरकरांना स्वातंत्र्यसैनिक असं वर्णन केले आहे ज्यांना ब्रिटीश सर्वात जास्त शोधत होते. नेताजी सुभाषचंद्र बोस हे वीर सावरकरांपासून प्रेरित असल्याचा दावाही त्यांनी केला.

चंद्र कुमार बोस म्हणतात, 'माफ करा, मोस्ट वॉन्टेड नेता आणि स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस होते. ते एकमेव आघाडीचे नेते होते आणि त्यांनी 18 ऑगस्ट 1945 रोजी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण केले.

पुढे ते म्हणतात की, 'आपल्या चित्रपटात हुड्डा यांनी दावा केला होता की बोस, भगतसिंग आणि खुदीराम बोस यांसारखे सहकारी स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकरांपासून 'प्रेरित' होते.

पण, नेताजी सुभाषचंद्र बोस हे स्वामी विवेकानंद यांच्याकडून प्रेरित होते, जे त्यांचे गुरू होते. तसेच ते देशबंधू चित्तरंजन दास यांच्याकडून प्रेरित होते, जे त्यांचे राजकीय गुरू होते.

चंद्र कुमार बोस पुढे म्हणाले की, वीर सावरकर महान व्यक्ती होते, पण नेताजी आणि ते वेगळे होते. नेताजींनी त्यांना विरोध केला होता, मग सावरकरांची विचारधारा ते कशी मान्य करणार?

चंद्र कुमार बोस यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 'ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्य चळवळीत सावरकर आणि मुहम्मद अली जिना यांच्याकडून कोणतीच अपेक्षा ठेवता येणार नाही' असे सांगितले होते .

चंद्र कुमार बोस म्हणतात की या चित्रपटातील रणदीपचे दावे खोटे आहेत. त्यांनी रणदीपला भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा योग्य आणि खरा इतिहास मांडण्याची विनंती केली आहे. पडद्यावर इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडणे हा तरुणांवर मोठा अन्याय होईल. इतकच नाही तर त्यांनी रणदीपवर आरोपही केला आहे की,

त्याने केवळ या मुद्यावकरुन वाद हाईल आणि वादाचा फायदा चित्रपटाला होईल म्हणुन असं केल्याचा आरोप केला आहे. चुकीचा इतिहास मांडणे हा गुन्हा असून इतिहासाशी छेडछाड करण्याचा अधिकार कोणालाही नसावा. अशा शब्दात त्यांनी या चित्रपटाबद्दल त्याच मत व्यक्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT