subhedar movie review directed by digpal lanjekar chinmay mandlekar subhedar songs showtimings  SAKAL
मनोरंजन

Subhedar Review: गनीमावर रोखल्या नजरा, तलवारी भिडल्या "सुभेदारा"चा महाराजांना मानाचा मुजरा!

दिग्पाल लांजेकरांच्या सुभेदार सिनेमाची सर्वांना उत्सुकता होती. कसा आहे सिनेमा? वाचा.

Devendra Jadhav

Subhedar Review: शिवाजी महाराजांची कीर्ती अफाट आहे. महाराजांची महती संपूर्ण जगभर पसरली आहे. बलदंड स्वराज्य उभं करण्यास शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी प्राणांची आहुती दिली. महाराजांच्या मावळ्यांनी गाजवलेला असाच एक पराक्रम म्हणजे कोंढाणा. उदयभानाच्या तावडीतून कोंढाणा जिंकून मावळ्यांनी राजांना दिलेला शब्द पाळला. या मोहिमेतला झुंजार गडी म्हणजे तान्हाजीराव मालुसरे.

याच कहाणीवर आधारित सुभेदार सिनेमाची सर्वांना उत्सुकता होती. कसा आहे सिनेमा? पाहूया.

(subhedar movie review directed by digpal lanjekar)

दिग्पाल लांजेकरच्या शिवराज अष्टक या सिनेमालिकेतील पाचवा सिनेमा म्हणजे सुभेदार. सुभेदारची गोष्ट आपण लहानपणापासून ऐकत आलोय. वाचत आलोय. त्यामुळे ही गोष्ट पडद्यावर साकार कशी होतेय, यात खरी कसरत होती. यात दिग्पाल लांजेकर बऱ्यापैकी यशस्वी झालेत. नाही असं नाही पण.. कथा विस्तार करण्यात सिनेमाची पकड सैल होते आणि सुभेदार संपल्यावर प्रभाव तितकासा राहत नाही.

गोष्ट सर्वांना माहीतच असेल... महाराजांचा लाडका मित्र आणि स्वराज्य निर्मितीसाठी प्राणांची बाजी लावायला मागे न हटणारा तान्हाजी. सरदार ते सुभेदार असा तान्हाजींचा प्रवास सिनेमात सुरुवातीला दिसतो. नंतर भर दरबारात घरातल्या मंगलकार्याची पर्वा न करता आधी लगीन कोंढाण्याच मग रायबाचं असा विडा उचलणारे तान्हाजीराव मालुसरे. पुढे तान्हाजी उदयभानाला कसं संपवतात आणि कोंढाणा मावळे कसे मिळवतात, याची कहाणी सुभेदार मध्ये दिसून येते.

सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मूळ गोष्ट रंजक आहे पण तिचा जीव नाही म्हटलं तरी छोटासा आहे. त्यामुळे कथा वाढवायला सिनेमाची लांबी अपेक्षेपेक्षा जास्त झालीय. मध्यंतराआधी सिनेमाचा वेग संथ आहे. त्यामुळे सिनेमाची मनावरची पकड सुटते. मध्यंतरानंतर शेवटपर्यंत सिनेमा वेगवान आहे. याशिवाय दिग्पालच्या आधीच्या सिनेमासारखी या सिनेमातली गाणी तितकी उठावदार नाहीत. तान्हाजी आणि उदयभान यांच्यातली लढाई मात्र रोमांच उभे करते. मुद्दा असा आहे की, काही प्रसंग टाळले असते, काटछाट केली असती तर सिनेमा आणखी प्रभावी झाला असता..

सुभेदार पाहताना हिंदीतल्या तान्हाजी सिनेमाची आठवण येते. तुलनेचा भाग नाही तरीही हिंदीत पटकथा सिनेमॅटिक अंगाने चांगली रचली गेली होती. सुभेदार मध्ये त्याचा अभाव जाणवतो. तेच तेच प्रसंग पुन्हा पुन्हा येत राहतात असं वाटतं. इतर प्रसंग टाळून सिंहगडावरची लढाई अजून दाखवली असती तर सिनेमाने अपेक्षित परिणाम साधला असता इतकंच!

अभिनयाच्या बाबतीत सर्वच कसलेले कलाकार आहे. चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत, मृणाल कुलकर्णी आऊसाहेब स्वतः दिग्पाल बहिर्जी नाईक असे कलाकार आहेत. सर्वात वरचढ म्हणजे अजय पूरकर तान्हाजी मालुसरे शोभले आहेत. केवळ नजरेने एखाद्याला गारद करण्याची ताकद तान्हाजींमध्ये होती. अजय पूरकर यांची शरीरयष्टी आणि अभिनय दोन्ही गोष्टी तान्हाजी मालुसरे आपल्यासमोर जिवंत उभे करतात. एकूणच सिनेमातील छोट्यातल्या छोट्या कलाकारांना या ऐतिहासिक विषयाचं पुरेपूर भान असल्याची जाणीव आहे.

तर एकूणच काही नवीन, किंवा वेगळं पाहण्याच्या अपेक्षेने जाल तर सुभेदार तुमची निराशा करेल. पण ऐतिहासिक सिनेमे पाहण्याची आवाड असेल, दिग्पालच्या शिवराज अष्टकचे चाहते आहात तर सुभेदार एकदा पाहायला काही हरकत नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT