Subhedar movie script poojan director digpal lanjekar cast ajay purkar  sakal
मनोरंजन

Subhedar: 'सुभेदार'येतायत.. थरकाप उडवायला.. शिवअष्टकातील पाचवं पुष्प आणि अजय पुरकर साकारणार..

लेखक दिग्पाल लांजेकर घेऊन येतोय तानाजी मालुसरे यांचा इतिहास..

नीलेश अडसूळ

marathi movie: मागील काही वर्षांपासून मराठी सिनेपटलावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शौर्यगाथांचा देदीप्यमान जागर सुरू आहे. वर्तमानकाळात रसिकांना शिवकालीन इतिहासाच्या क्षणांचे साक्षीदार बनवण्याच्या या वाटेवर लेखक-दिग्दर्शक-अभिनेता-निर्माता दिग्पाल लांजेकरचे मोलाचे योगदान आहे. दिग्पालने दिग्दर्शित केलेल्या 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड' आणि 'शेर शिवराज' या शिवराज अष्टकातील चार यशस्वी चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत राष्ट्रीय पातळीवरील रसिकांचेही लक्ष वेधून घेतलं आहे. 'शेर शिवराज' नंतर दिग्पाल लांजेकरने आता पाचव्या सिनेमाची घोषणा केली असून नुकतेच त्याचे संहिता पूजन झाले. (Subhedar movie script poojan director digpal lanjekar cast ajay purkar)

‘सुभेदार' असे या चित्रपटाचे नाव असून सुभेदार तान्हाजी मालुसरेंची शौर्यगाथा सांगणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात तान्हाजी मालुसरे आणि त्यांनी राखलेल्या सिंहगडाची थरारक कथा पहायला मिळणार आहे. पोटच्या मुलाचं लग्न बाजूला सारून किल्ले कोंढाण्याच्या शिखरावर स्वराज्याचं विजयी तोरण बांधण्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या एका बलाढ्य योद्ध्याचा रोमहर्षक पराक्रम 'सुभेदार'मध्ये अनुभवायला मिळेल. तान्हाजी मालुसरे यांनी भूमिका अभिनेता अजय पुरकर साकरणार आहे.

गोडवली ग्रामस्थ आणि नरवीर तानाजी मालुसरे कुटुंबियांच्या उपस्थितीत सुभेदार चित्रपटाची संहिता पूजन सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी सुभेदार तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणारे अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, स्मिता शेवाळे आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर उपस्थित होते.

नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जन्मस्थानी म्हणजेच सातारा जिल्ह्यातील गोडवली गावात त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत सुभेदार चित्रपटाच्या संहितेचे पूजन करून या चित्रपटाचा श्रीगणेशा करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Constituency: मनसेनं २००९ मध्ये कोणते मतदारसंघ जिंकले होते? ते आमदार आता कुठे आहेत? राज ठाकरेंना पुन्हा यश येणार?

Latest Marathi News Updates live : छगन भुजबळ यांनी केला प्रचाराचा शुभारंभ

Tax Evasion: देशात 18,000 बनावट कंपन्या; सरकारची 25,000 कोटी रुपयांची फसवणूक, काय आहे प्रकरण?

शेवटी आईच ती! दिवाळीच्या सुट्ट्या संपवून शूटिंगला परतणाऱ्या सिम्बाला निरोप देताना हमसून रडली माउली, नेटकरी म्हणाले-

Sawantwadi Election : सावंतवाडीत राजकीय 'संशयकल्लोळ'; बंडखोरीमुळे मतदारसंघात पेच, कोण कोणाची मते पळवणार?

SCROLL FOR NEXT