Subodh Bhave: 'हर हर महादेव' हा मराठी सिनेमा सध्या जोरदार चर्चेत आहे तो एका वादामुळे. सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीचा दाखवला गेला आहे असं अनेक संघटनांचे म्हणणे आहे. सिनेमाविरोधात आंदोलन पुकारत अनेक ठिकाणी थिएटरात सुरु असलेला सिनेमाचा शो बंद पाडला जात आहे. पुण्यात तर जोरदार निदर्शनं केली गेली. यादरम्यान आता सुबोध भावेची एक पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.
खरंतर या पोस्टचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा सुबोधन ज्या सिनेमात साकारली आहे त्या 'हर हर महादेव'चा काहीएक संबंध नाही, पण तरीही सुबोधच्या त्या पोस्टवर एक चाहता मात्र भडकला अन् त्यानं सुबोधला 'हर हर महादेव' सिनेमावरनं उलट-सुलट सुनावलं. चला जाणून घेऊया सविस्तर सुबोधच्या त्या पोस्टविषयी.(Subodh Bhave Post on Hollywood Drama Series 'The Offer', Actor trolled)
सुबोध भावेनं त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर एका हॉलीवूड ड्रामा मिनी सिरीज संदर्भात पोस्ट केलेली आहे. त्याचं नाव आहे 'द ऑफर'. सुबोधनं पोस्टर शेअर करत लिहिलं आहे,''कधीतरी असं अद्भुत काहीतरी पहायला मिळतं आणि वाटतं की सगळ्यांनी आवर्जुन बघा म्हणून आग्रह करावा. कलाक्षेत्रात असणाऱ्यांनी तर पहायलाच हवा''. खरंतर सुबोधनं जी पोस्ट केलीय त्याच्यावर चाहत्यानं भडकण्यासारखं काहीच नाही. पण त्याच्या त्या पोस्टवर चाहता म्हणाला आहे,'असेच प्रयत्न जरा हर हर महादेव मध्ये करायला हवे होते.. सोयीनुसार इतिहास खूप चुकीचा दाखवला आहे.' आता हे लिहिताना चाहता सुबोधच्या अभिनयाचं कौतूक करायला मात्र विसरलेला नाही.
सुबोधचा 'हर हर महादेव' हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झाला. सिनेमाला चांगला प्रतिसादही मिळाला. पण आता सिनेमात दाखवलेल्या इतिहासावर मात्र महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार आक्षेप नोंदवला जातोय. हा सिनेमा दाक्षिणात्य भाषांमध्ये देखील रिलीज झाला आहे. सिनेमात बाजीप्रभू देशपांडेंच्या भूमिकेत शरद केळकर भाव खाऊन गेलाय. हार्दिक जोशी,सायली संजीव यांच्या भूमिकाही लक्ष वेधत आहेत. पण वादामुळे चांगल्या सिनेमाला गालबोट लागलंय अन् आता यावरनं कलाकारांनाही लोक सुनावू लागलेयत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.