Subrata Roy Sahara Death Bollywood connection : सहाराचे संस्थापक सुब्रतो रॉय यांचे नुकतेच आजारपणामुळे निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वेगवेगळ्या गोष्टींमुळे सतत लाईमलाईटमध्ये राहणाऱ्या सुब्रतो रॉय यांचा विविध क्षेत्रांमध्ये वावर होता. त्यांचे राजकारण्यांपासून बॉलीवूडमधील अनेक दिग्गजांशी घनिष्ठ संबंध होते.
रॉय यांच्या जाण्यानं बॉलीवूडलाही मोठा धक्का बसला आहे. ते प्रसिद्ध निर्माते म्हणूनही ओळखले गेले. त्यांच्या सहारा वन मोशन पिक्चर एंटरटेनमेंटच्यावतीनं अनेक लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती करण्यात आली होती. या मनोरंजन कंपनीच्यावतीनं सलमानची प्रमुख भूमिका असलेला आणि प्रभुदेवानं दिग्दर्शित केलेला वाँटेड, नो इंट्री, नागेश कुकूनुरचा डोर, जो बोले सो निहाल, परेश रावल यांचा मालामाल विकली, शाहिद कपूरचा दिल मांगे मोअर चित्रपटांचा समावेश होता. Subrata roy sahara death in Mumbai know about the details
याशिवाय केके मेननचा कॉर्पोरटे, कच्चा लिंबू, डरना जरुरी है सारख्या चित्रपटांनी देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. बॉलीवूडमध्ये या चित्रपटांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्याची चाहत्यांमध्ये चर्चाही होती. सुब्रतो रॉय हे आणखी एका वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आले होते ते म्हणजे त्या २५० कोटींच्या लग्नामुळे, त्या लग्नाची गेली कित्येक दिवस चर्चा होती. बॉलीवूडचे शहेनशहा बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत सुब्रतो रॉय यांचे खास कनेक्शन होते असेही म्हटले जाते.
अमिताभ यांची एबी कॉर्प आणि सुब्रतो रॉय...
अमिताभ बच्चन यांनी एबी कॉर्प नावाची प्रॉडक्शन कंपनी सुरु केली होती. मात्र पुढे ही कंपनी दिवाळखोरीत निघाली. त्यामुळे अमिताभ यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला होता. ते निराशेच्या गर्तेत गेले होते. अशावेळी त्यांना आधार देण्याचे काम सुब्रतो रॉय यांनी केल्याचे सांगितले जाते. सुब्रतो रॉय यांच्या मुलाचं सुशांतोचं लग्न हा त्यावेळी प्रचंड चर्चिला गेलेला विषय होता. ते २५० कोटीचं लग्न होतं. त्या लग्नामध्ये चक्क बिग बी अमिताभ बच्चन यांनी सुत्रसंचालन केलं होतं हे सांगून विश्वास बसणार नाही.
फेब्रुवारी २००४ मध्ये सुशांतो आणि सीमातोचं लग्न झालं होतं. त्या लग्नाला वऱ्हाडी मंडळी विमानानं आली होती. लखनौमध्ये झालेल्या या लग्नाच्या तयारीची मोठी हवा होती. लखनौचं विमानतळं प्रचंड व्यस्त होतं. प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी या संपूर्ण लग्नाची एक फिल्म तयार केली होती. तर देशातील सर्वात प्रसिद्ध हॉटेल ताज मधील मुख्य शेफ हेमंत ऑबेरॉय यांच्या नेतृत्वाखाली पाहुण्या मंडळींसाठी पंचपक्वान तयार करण्यात आले होते.
सुशांतोच्या लग्नासाठी खास लंडनवरुन सिम्फनी ऑर्केस्ट्रा बोलवण्यात आला होता. पाहुण्यांमध्ये सर्वात पहिलं नाव होतं ते तत्कालीन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी. या लग्नाच्या अगोदर मुलायम सिंह यांच्या मुलाचे लग्न झाले होते. ते लग्न देखील सहारा नावाच्या शहरात झाले होते. पुढील कित्येक महिने सुब्रतो रॉय यांच्या मुलाच्या लग्नाची विविध माध्यमातून चर्चा सुरु होती. त्या लग्नात बॉलीवूडमधील कित्येक सेलिब्रेटींनी गर्दी केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.