मनोरंजन

अथक मेहनत घेणाऱ्या विराटचा 'केसरी' प्रवास; म्हणाला...

'पहिले ६ महिने त्रास झाला, पण...'; 'केसरी'फेम विराट मडकेचा प्रवास

शर्वरी जोशी

विराट मडके हे नाव सध्याच्या तरुणाईसाठी नवीन राहिलेलं नाही. ‘केसरी – saffron’ या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर झळकणारा हा अभिनेता पहिल्या चित्रपटापासूनच चर्चेत आहे. कुस्तीवर आधारित ‘केसरी – saffron’ या चित्रपटात विराटने मुख्य भूमिका साकारली असून या चित्रपटासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली आहे. ‘हिंद केसरी’, ‘महान भारत केसरी’ रोहित पटेल व ‘महाराष्ट्र केसरी’, ‘रुस्तूम – ए – हिंद’ किताब पटकावलेल्या अमोल बुचडे यांच्या मार्गदर्शनाखाली विराटने कुस्तीचे धडे गिरवले आहेत. या प्रशिक्षणाविषयी आणि कुस्तीविषयी अलिकडेच विराटने त्याच मत व्यक्त केलं आहे. (sujay-dahakes-kesari-movie-virat-madke-first-marathi-movie)

"कुस्तीसाठी प्रचंड शारीरिक तयारी लागते. पहिली दोन वर्ष मी फक्त शारीरिक मेहनतीवर भर दिला होता. दररोज मी १० किलोमीटर धावायचो, संध्याकाळी २ तास जीममध्ये वर्कआऊट करायचो. या काळात केवळ शारीरिक मेहनतच नव्हे तर माझ्या डाएटकडेही फार लक्ष देण्यात आलं होतं. खरंतर सुरुवातीचे ६ महिने मला फार त्रास झाला. पण नंतर या सगळ्याची सवय होऊ लागली", असं विराट म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "डाएटसोबतच मी हळूहळू तालमीत कुस्तीचा सराव सुरु केला. यावेळी तालमीतील सर्व मल्ल आणि खेळाडूंनी मला प्रचंड मदत केली. खऱ्या पहेलवानांसोबत कुस्तीचा सराव करायची संधी मिळाली. त्यामुळे मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो.लअशी संधी मला आयुष्यात पहिल्यांदा मिळाली आणि या संधीच मला सोनं करायचं होतं. मला ही संधी देणारे या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांचा मी ऋणी आहे. माझ्यासाठी ही संधी खूप स्वप्नवत होती."

विराट मूळ कोल्हापूरचा असून त्याच्या घरातील काही जणदेखील पहेलवान आहेत. परंतु, विराटचा कुस्तीशी थेट संबंध आला नव्हता. मात्र, या चित्रपटाच्या निमित्ताने त्याला कुस्ती व पहेलवान यांना जवळून अनुभवता आलं असं मत त्याने व्यक्त केलं.

दरम्यान, या चित्रपटात विराट मडके, महेश मांजरेकर, विक्रम गोखले, मोहन जोशी, प्रवीण तरडे, नंदेश उमप या कलाकारांनी भूमिका केल्या आहेत. या चित्रपटाचे संकलन दिग्दर्शन सुजय डहाकेचे असून लेखन नियाज मुजावर यांनी केले आहे. ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांचे संगीत दिलेल्या या चित्रपटाला क्षितिज पटवर्धन, वैभव जोशी, संजय टेम्भूर्णी यांच्या गीते केली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT