sukanya mone new marathi movie Indradhanushya after baipan bhaari deva SAKAL
मनोरंजन

Indradhanushya: सुकन्या मोनेंची 'बाईपण भारी देवा' नंतर नवी भुमिका, स्वप्निल जोशी सोबत जमणार जोडी

Devendra Jadhav

बाईपण भारी देवा सिनेमा चांगलाच गाजला. बाईपण भारी देवा सिनेमात अभिनेत्री सुकन्या मोनेंनी भुमिका साकारली.

आता सुकन्या मोने बाईपण भारी देवा नंतर नवीन भुमिकेत दिसणार आहेत. सुकन्या मोने आता स्वप्निल जोशी सोबत इंद्रधनुष्य सिनेमात अभिनय करणार आहेत.

(sukanya mone new marathi movie Indradhanushya after baipan bhaari deva)

‘मनातल्या उन्हात’, ‘ड्राय डे’, ‘भारत माझा देश आहे’ असे उत्तम आशयसंपन्न चित्रपट दिग्दर्शित केलेले पांडुरंग जाधव आता ‘इंद्रधनुष्य’ हा नवा चित्रपट लंडनमध्ये चित्रीत करत आहेत. अभिनेता स्वप्नील जोशीसह सागर कारंडे, अभिनेत्री

प्रार्थना बेहेरे, दीप्ती देवी, अदिती सारंगधर, सुकन्या मोने, नम्रता गायकवाड, नेहा खान, श्वेता पाटील अशी दमदार स्टारकास्ट असून चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त नुकताच करण्यात आला.

आशिष अग्रवाल यांच्या एबीसी क्रिएशन्स या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून ‘इंद्रधनुष्य’ चित्रपटाची निर्मिती करण्यात येत असून नितीन वैद्य चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन पांडुरंग जाधव, पटकथा पांडुरंग जाधव, विपुल देशमुख आणि संवादलेखन विपुल देशमुख यांचेच आहे. नागराज दिवाकर छायांकनाची, वरुण लखाते संगीत दिग्दर्शनाची तर निलेश गावंड संकलनाची जबाबदारी सांभाळणार आहेत.

चित्रपटाची कथा एक पुरुष आणि सात बायका या कथानकावर आधारित असून अतिशय धमाल आणि मनोरंजक अशी आहे. लंडनमध्ये घडणाऱ्या या कथानकावरील चित्रपटाचं चित्रीकरण लंडनमध्ये सुरू झालं आहे. या चित्रपटामुळे अभिनेता स्वप्नील जोशी पहिल्यांदाच लंडनमध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणाचा अनुभव घेत आहे. पांडुरंग जाधव यांनी आतापर्यंत केलेले तीनही चित्रपट उत्तम गोष्ट सांगणारे असल्यानं ‘इंद्रधनुष्य’ या चित्रपटातही त्यांच्या दिग्दर्शनाचे आणि सर्व स्टारकास्टच्या अभिनयाचे सप्तरंग दिसतील याची नक्कीच खात्री आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : ९८व्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी तारा भवाळकर यांची निवड

IND vs PAK T20WC : what a ball…! पाकिस्तान संघाला पहिल्याच षटकात धक्का, Renuka Singh ने उडवला त्रिफळा, Video

Bigg Boss Marathi 5 grand finale LIVE Updates - कोण जिंकणार 'बिग बॉस मराठी ५' ची ट्रॉफी? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

गोफण | सुखाची झोप उडाली, वस्तादांचा मोठा गेम

Maharashtra Politics: मोदींचं मंदिर बांधलेला भक्त सावध झाला; भाजपला मात्र 'राम राम' ठोकला

SCROLL FOR NEXT