sukh mhanje nakki kay asta serial 
मनोरंजन

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेचं कथानक उत्कंठावर्धक वळणावर

कबड्डीच्या सामन्यात खेळण्यासाठी जयदीपसोबत गौरीही झाली सज्ज

स्वाती वेमूल

स्टार प्रवाह Star Pravah वहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं Sukh Mhanje Nakki Kay Asta मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. गमावलेली प्रॉपर्टी पुन्हा मिळवायची असेल तर शिर्केपाटील कुटुंबासमोर सध्या एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे शालिनीविरुद्ध कबड्डीचा सामना जिंकणं. यासाठी संपूर्ण कुटुंबाने एकत्र येत मेहनत घेतली आहे. भैरु कोचच्या मार्गदर्शनाखाली जोरदार सराव करत आता अंतिम सामन्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे.

कबड्डीच्या संघात किमान सात खेळाडू असणं बंधनकारक असतं. त्यामुळे ऐन मोक्याच्या क्षणी गौरीने मैदानात एण्ट्री घेत कबड्डीच्या सामन्यात नवा ट्विस्ट आणला आहे. त्यामुळे हा सामना उत्कंठावर्धक असणार यात शंका नाही. या सामन्याच्या निमित्ताने गौरीचं नवं रुप पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. तिच्यातला आत्मविश्वास, जिद्द आणि चिकाटी शिर्केपाटील कुटुंबाला त्यांचे समृद्ध दिवस पुन्हा मिळवून देईल याची खात्रीही आहे.

गौरी- जयदीप विरुद्ध शालिनीचा संघ असा हा चुरशीचा सामना प्रेक्षकांना रविवार १४ नोव्हेंबरला दुपारी १ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता २ तासाच्या महाएपिसोडमध्ये पाहायला मिळेल. या मालिकेत अभिनेत्री गिरिजा प्रभू ही गौरीची तर अभिनेता मंदार जाधव हा जयदीपची भूमिका साकारत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT