Sulochana Latakar 
मनोरंजन

Sulochana Latakar Death : सुलोचनादिदींनी अमिताभ बच्चनला पाठवलेलं ते पत्र, अख्ख्या महाराष्ट्राला भावूक करणारं दोघांचं नातं

Sandip Kapde

Sulochana Latakar : मराठी चित्रपट विश्वात आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा निर्माण करणाऱ्या सुलोचना दीदी अर्थात सुलोचना लाटकर यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला होता.

सोशल मीडियावर सुलोचना लाटकर यांच्याबाबत जून्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. अशातच बॉलिवूडचे बादशाह अमिताभ बच्चन यांना सुलोचना लाटकर यांनी पत्र लिहले होते ते पत्र अमिताभ यांनी शेअर केले होते. (Sulochana Latakar Death)

पत्र फेसबुकवर शेअर करताना अमिताभ यांनी लिहले होते की, "सुलोचनाजींनी अनेक चित्रपटांमध्ये माझ्या आईची भूमिका साकारली होती त्यांचा स्नेह, प्रेम आणि आशीर्वाद नेहमीच होता, पण माझ्या ७५ व्या वाढदिवशी त्यांनी मला त्यांचे पत्र भेट दिले. ते पाहून मी भारावून गेलो. हे पत्र शेअर करण्यापासून मी स्वत:ला रोखू शकलो नाही."

सुलोचना यांनी पत्रात काय लिहिले होते?

"आज तुम्हाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत, मराठी भाषेत अशा वर्षांना 'अमृतमहोत्सव' म्हणतात. तुम्हाला अमृताचा अर्थ आधीच माहित आहे. या अमृताचा वर्षाव तुमच्या भावी आयुष्यावर सदैव होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

'रेश्मा और शेरा'मधला सीरियस, शर्मिलाचा 'छोटू' मला आजही आठवतो. तोच 'छोटू' आजही डोंगराएवढा भक्कम आणि अवाढव्य पाहतो तेव्हा मला देवाचा चमत्कार वाटतो.'

सुलोचना लाटकर आणि अमिताभ बच्चन यांनी 'मुकद्दर का सिकंदर' (१९७८), 'मजबूर' (१९७४) आणि 'रेश्मा और शेरा' (१९७१) मध्ये एकत्र काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवार यांची पुन्हा भर पावसात सभा, म्हणाले- अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते अन्....

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

...तर त्यांना शिवतीर्थ कसा आशीर्वाद देणार? शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

Malegaon Crime : पोलिसांनी पकडला प्रतिबंधित गुटखा, ११ लाख ३९ हजार ५६० रुपयांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT