Sulochana Latkar Passed Away Marathi Actress age 94 mumbai esakal
मनोरंजन

Sulochana Latakar : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन, ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

दीदी या काही दिवसांपासून श्वसनाच्या आजाराने त्रस्त होत्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

युगंधर ताजणे

Sulochana Latkar Passed Away Marathi Actress age 94 mumbai : मराठी चित्रपट विश्वात आपल्या अभिनयानं वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सुलोचना दीदी अर्थात सुलोचना लाटकर यांचे निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी दादरच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सुलोचना दीदींच्या जाण्यानं मराठी चित्रपट विश्वाला मोठा धक्का बसला आहे. दीदींच्या जाण्याचे वृत्त कळताच मराठी, हिंदी चित्रपट विश्वातील अनेक दिग्गज सेलिब्रेटींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दीदी या काही दिवसांपासून श्वसनाच्या आजाराने त्रस्त होत्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापूर्वी मार्च मध्ये जेव्हा सुलोचनादीदी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुलोचनादीदींवरील उपचारांचा सर्व खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सामनं दिलेल्या वृत्तानुसार दीदींनी मुंबईतील दादरमधील एका रुग्णालयात निधन झाल्याचे म्हटले आहे.

सुलोचना दीदींचे जाणे हे मराठी प्रेक्षकांच्या मनाला चटका लावून जाणारे आहे. केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपट विश्वात देखील त्यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले होते. त्यांचा सदैव हसरा चेहरा आणि त्या सात्विक चेहऱ्यावरील तेज चाहत्यांसाठी मोठी समाधानाची बाब होती. त्यांच्या जाण्यानं चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

दीदींच्या चित्रपट कारकीर्दीविषयी सांगायचे झाल्यास त्यांनी, मराठा तितुका मेळवावा, मोलकरीण, बाळा जो जो रे, सांगते ऐका, सासुरवास, वहिनीच्या बांगड्या अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केले होते. त्या चित्रपटातील त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात त्यांनी आदराचे स्थान निर्माण केले होते.

याशिवाय आये दिन बहार के, कटी पतंग, नाटक, चिराग, संबंध अशा हिंदी सिनेमांमध्ये अभिनय केला होता. दीदींच्या जाण्यानं चाहत्यांना शोक अनावर झाला असून सोशल मीडियावर त्यांना चाहत्यांनी आदरांजली वाहिली आहे. याशिवाय हिंदी, मराठी सिनेविश्वातील सेलिब्रेटींनी देखील दीदींच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

Priyanka Gandhi Vadra :प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान, म्हणाल्या- तुम्ही मंचावरुन एकदा जाहीर करा...

Ahilyanagar Crime : मोठा शस्‍त्रसाठा जप्त...जम्‍मू-काश्‍मिरच्या आरोपींकडून ९ रायफली, ५८ काडतुसे जप्त

Nitin Raut Video: 'जय भीम' म्हटल्याने विलासरावांनी मंत्रिपद नाकारलं; काँग्रेस नेते नितीन राऊतांचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray : प्रियंका गांधी बाळासाहेबांवर भरभरुन बोलल्या; त्यांनी भाजपचे दात घशात घातले, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

SCROLL FOR NEXT