Suniel Shetty Speaks On drugs And Bollywood... Instagram
मनोरंजन

'ड्रग्ज आणि बॉलीवूड...' सुनिल शेट्टी स्पष्टच बोलला

गेल्या काही वर्षात बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींची नावं ड्रग्ज केसमध्ये समोर आलेली आहेत. काहींनी या प्रकरणात जेलची हवा देखील खाल्ली आहे.

प्रणाली मोरे

अभिनेता सुनिल शेट्टी(Suniel Shetty) यानं नुकत्याच एका कार्यक्रमात बॉलीवूड आणि ड्रग्ज या मोठ्या विषयावर थेट भाष्य केलं आहे. त्याच्या बोलण्याचे अनेक अर्थ लावले जात आहेत अन् या चर्चेला उधाण आलं आहे. गेल्या काही वर्षात बॉलीवूडच्या अनेक ड्रग्ज केस(Drugs Case) उघडपणे समोर आल्या. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर तर एनसीबी बॉलीवूडच्या मागे हात धुवून लागली. यानंतर बॉलीवूड मधल्या अनेक बड्या सेलिब्रिटींची नावं ड्रग्ज प्रकरणात पुढे आली. अनेकांना चौकशीसाठी बोलावण धाडलं. शाहरुख खानचा मुलगा 'आर्यन खान ड्रग्ज केस' ही अलिकडची सगळ्यात मोठी केस. बाकी छोट्या-मोठ्या आहेतच. अनेक स्टार किड्सची नावं या ड्रग्ज केसेसमध्ये समोर आली. आता याच सगळ्यावर सुनिल शेट्टीनं मोठं विधान केलंय. काय म्हणालाय सुनिल शेट्टी, चला जाणून घेऊया.(Suniel Shetty Speaks On drugs And Bollywood)

सुनिल शेट्टीला एका कार्यक्रमात बॉलीवूड आणि ड्रग्ज केसेस यासंदर्भात काही प्रश्न विचारले गेले. हा कार्यक्रम सीबीआय तर्फेच International day against drug abuse and illicit trafficing निमित्तानं आयोजित केला गेला होता. यावेळी विचारलेल्या प्रश्नांना सामोरं जाताना सुनिल शेट्टीनं बॉलीवूड विरोधात नाही तर बॉलीवूडची बाजू घेत काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. तो म्हणाला,''बॉलीवूड काही ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्यांची किंवा सेवन करणाऱ्यांची इंडस्ट्री नाही. यावेळी तो ड्रग्ज प्रकरणात चर्चेत आलेले सेलिब्रिटी आणि स्टार किड्स यांच्याविषयी देखील स्पष्ट बोलला आहे. तो म्हणाला,त्यांना त्यांची चूक कळाली असेल तर सुधारण्याची संधी द्यायला हवी. माफ करायला हवं''.

बॉलीवूड सेलिब्रिटींना ड्र्ग्ज प्रकरणात टार्गेट केलं जातं का? त्यांना मुद्दामहून ड्रग्ज Addicts ठरवलं जातं का? यावर सुनिल शेट्टी म्हणाला, ''एक चूक केली की लगेच चोर,दरोडेखोर ठरवलं जातं. मी ३० वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे आणि माझे ३०० मित्र आहेत,पण त्यांनी आतापर्यंत आयुष्यात असं काहीच केलेलं नाही''.

सुनिल शेट्टी पुढे म्हणाला,''बॉलीवूड काही ड्रग्ज सेवन किंवा ड्रग्ज व्यावसायिकांनी भरलेलं नाही. चूका आपणही करतो,त्यांना देखील आपलीच मुलं समजून माफ करा.यावेळी अभिनेत्यानं बॉयकॉट बॉलीवूड ट्रेन्डवर देखील भाष्य केलं. बॉयकॉट बॉलीवूड ,बॉलीवूड ड्रगिस्ट असं काही नाहीय हे त्यानं ठणकावून सांगितलं''.

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आणि अभिनेते शक्ती कपूर यांचा मुलगा ड्रग्ज प्रकरणात जेरबंद झाला होता. बंगळूरात एका पार्टीत त्याला अटक झाली होती. नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. त्याआधी आर्यन खान केस चांगलीच गाजली. त्याला जवळपास महिनाभर जेलमध्ये रहावं लागलं होतं. पण नंतर NCB ने त्याला या ड्रग्ज केस प्रकरणात क्लीन चीट दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT