Sunile Shetty esakal
मनोरंजन

Sunile Shetty : 'अण्णा तू अजूनही एवढा फिट कसा?' 61 वर्षाच्या सुनील शेट्टीनं सांगितलं 'फीटनेस सिक्रेट'

बॉलीवूडचा अण्णा अशी सुनील शेट्टीची ओळख आहे. कुणीही गॉडफादर नसताना बॉलीवूडमध्ये स्वताची वेगळी छाप त्यानं प्रेक्षकांच्या मनात उमटवली आहे.

युगंधर ताजणे

Suniel Shetty Fitness : बॉलीवूडचा अण्णा अशी सुनील शेट्टीची ओळख आहे. कुणीही गॉडफादर नसताना बॉलीवूडमध्ये स्वताची वेगळी छाप त्यानं प्रेक्षकांच्या मनात उमटवली आहे. बॉलीवूडमध्ये पहिल्यांदा बॉडी, मसलची क्रेझ जर कुणी तयार केली असेल तर त्याचे श्रेय सुनील शेट्टीला द्यावे लागेल. वयाच्या साठी ओलांडली तरी अजूनही सुनील शेट्टीचा फिटनेस खूप काही सांगून जाणारा आहे. Sunile Shetty Fitness Secret daily routine share

काही महिन्यांपूर्वी सुनील शेट्टी, विवेक ऑबेरॉय आणि सोनाली कुलकर्णी यांची धारावी बँक नावाची एक मालिका प्रदर्शित झाली होती. त्यात सुनील शेट्टीनं साऊथच्या अण्णाची रंगवलेली भूमिका अनेकांच्या कौतूकाचा विषय झाली होती. त्यानंतर सुनील शेट्टी हा त्याच्या लाडक्या लेकीच्या अथियाच्या लग्नामुळे देखील चर्चेत आला होता. आता पुन्हा तो फिटनेससाठी चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे.

सुनील शेट्टीचं वय आता ६१ वर्षांचे आहे. पण त्याचा फिटनेस अजूनही तरुणांना लाजवणारा आहे. अण्णानं त्याच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून नेहमीच फिटनेसचे महत्व सांगितले आहे. व्यायमाचे महत्व पटवून दिले आहे. अशावेळी सुनील शेट्टी आणि त्याच्या फिटनेसला फॉलो करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. आता त्यानं पुन्हा एकदा त्याच्या फिटनेसविषयी तरुणांना सांगितलं आहे.

सुनील शेट्टीनं तरुणांना आवाहन केले आहे की, मी फिटनेससाठी काही गोष्टी आवर्जून पाळल्या आहेत. तुम्हाला जर तसा फिटनेस ठेवायचा असेल तर तुम्हीही त्या गोष्टी करा. यापूर्वी कित्येकदा सुनील शेट्टीनं चाहत्यांसोबत काही फिटनेसचे मोटिव्हेशनल व्हिडिओ शेयर केले आहेत. ज्यामुळे तरुणांना फिटनेससाठी प्रेरणा मिळाली आहे. आताही त्यानं एक व्हिडिओ त्याच्या लिंकडेनवरुन शेयर केला आहे.

त्या व्हिडिओमध्ये सुनील शेट्टी सांगतो की, तो रोज पहाटे पाच वाजता उठतो. कामाला जाण्यापूर्वी स्वताला किमान चार ते पाच तास मी देतो. मी जीम करतो. त्यानंतर योगा काही ब्रिदिंग एक्झरसाईजही करतो. जीममध्ये मी मोबाईल पासून लांब राहणे पसंद करतो. काहीही झालं तरी मोबाईलला हात लावायचा नाही. हे मी पहिल्यापासून ठरवलं आहे. आणि ते कटाक्षानं पाळतो देखील.

योग्य आहार आणि योग्य प्रमाणात झोप हे सगळ्यात महत्वाचे असून तुम्ही तुमच्या कुटूंबासमवेत वेळ घालवणे ही गोष्ट प्रामुख्यानं लक्षात घेण्याची गरज आहे. असेही सुनील शेट्टीनं सांगितले आहे. अण्णाच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास तो ऑपरेशनल फ्रायडे आणि हेरा फेरी ३ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT