Sunny Deol News  esakal
मनोरंजन

सनी देओल राष्ट्रपती निवडणुकीला का होता गैरहजर? कारण आलं समोर

खासदार सनी देओल हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला आहे. त्याचे कारण तो राष्ट्रपती निवडणूक मतदान प्रक्रियेत तो गैरहजर असल्याचे दिसून आले.

युगंधर ताजणे

Sunny Deol News: खासदार सनी देओल हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला आहे. त्याचे कारण तो राष्ट्रपती निवडणूक मतदान प्रक्रियेत तो गैरहजर असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याच्या नावाची मोठ्या प्रमाणावर चर्चा होती. (Presidential Election 2022) देशाच्या राष्ट्रपतीपदी झारखंड राज्याच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांची निवड झाली आहे. त्या देशाच्या 15 व्या राष्ट्रपती आहे. राष्ट्रपती पदासाठी मतदान झाले. मात्र या मतदानाला अनेक खासदार गैरहजर होते. त्यासगळ्यात अभिनेता सनी देओलच्या नावाची चर्चा होत आहे.

सनी देओल त्या मतदान प्रक्रियेत सहभागी न झाल्यानं त्याच्यावर सोशल (Bollywood Actor) मीडियातून मोठ्या प्रमाणावर टीकाही झाली. सगळीकडे चर्चा होती की, त्यानं मतदान का केलं नाही, त्यानंतर आता सनीनं मतदान का केलं नाही याचं कारण समोर आलं आहे. सनीनं आपण मतदानाला गैरहजर का होतो याचे याविषयी सांगितलं आहे. त्यात तो म्हणतो, त्यावेळी आपण अमेरिकेत होतो. पाठीचं दुखणं जास्त वाढल्यानं तातडीनं अमेरिकेत जावं लागलं. त्यामुळे मला मतदान करता आलं नाही. त्याच्या या बातमीनं मात्र चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉलीवूडचा अॅक्शन हिरो सनी देओलला काही दिवसांपूर्वी पाठीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यावर उपचार करण्यासाठी त्याला अमेरिकेत जावे लागले. अमेरिकेत उपचार घेतल्यानंतर त्यानं काही दिवस मुंबईत देखील उपचार घेतले आहे. सनीच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास, तो बाप, सूर्या, गदर 2 आणि अपने 2 मध्ये दिसणार आहे. बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर सनी कमबॅक करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT