Sunny Deol IQ Greater Than Albert Einestein interview  esakal
मनोरंजन

Sunny Deol : 'माझा IQ आईन्स्टाईनपेक्षा जास्त', सनीचा दावा! नेटकऱ्यांनी केला 'गदर'

आता सनीनं दिलेली प्रतिक्रिया अनेकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आले आहे.

युगंधर ताजणे

Sunny Deol IQ Greater Than Albert Einestein interview : गदर २ च्या यशानंतर सनी देओल हा तुफान चर्चेत आहे. तब्बल २२ वर्षानंतर त्याचा गदर २ नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी दिग्दर्शित केलेल्या गदर २ ने आतापर्यत पाचशे कोटींची कमाई करुन एक मोठा विक्रम केला आहे.

यासगळ्यात सनी देओल गदर २ च्या प्रमोशनसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात आहे. त्यानं भारत पाकिस्तान बॉर्डर पासून परदेशामध्ये देखील त्यानं गदर २ चे दणक्यात प्रमोशन केले आहे. त्याला तेथील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. आता सनीनं दिलेली प्रतिक्रिया अनेकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आले आहे. त्यानं स्व:ताच्या बुध्दिमत्तेची तुलना जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईनशी केली आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी सनीचा चांगलाच क्लास घेतला आहे.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली

काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक शर्मा यांनी तर गदर २ हा आता ऑस्करला पाठविणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे पुन्हा एकदा गदर २ वर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला होता. सनीनं तर गदर हा चित्रपट नसून ती प्रेक्षकांच्या मनातील एक ज्वलंत भावना आहे. असे चित्रपट हे नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घर करुन असतात अशी प्रतिक्रिया सनीनं दिली होती. असं असताना त्यानं आता स्वताच्या आय क्यु बाबत केलेलं ते विधान नेटकऱ्यांच्या रडारवर आले आहे.

सनीनं रणवीर अलाहबादिया नावाच्या युट्युबरला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ते विधान केलं आहे. त्यात तो म्हणतो की, शाळेत असताना माझा आयक्यु हा १६० होता. तो खूपच जास्त होता. शाळेत जेव्हा आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक तपासण्यात आला तेव्हा तो १६० च्या जवळपास होता. असे सनीनं सांगितले. त्यानंतर मात्र सोशल मीडियावर सनीवर नेटकऱ्यांनी टीका केली आहे.

नेटकरी म्हणतात, जर सनीचा आय क्यू हा १६० पेक्षा जास्त असेल तर त्यानं महान शास्त्रज्ञ आईन्स्टाईन यांच्या बुद्धयांकाशी बरोबरी केली आहे. आईनस्टाईन यांनी तर थेरी ऑफ रिलेटीव्हीटी शोधून काढली होती. असं म्हटलं जातं की, ज्यांचा बुद्ध्यांक हा १४० पेक्षा जास्त असेल तर अशा व्यक्ती जिनिअस या प्रकारात मोडतात.

या मुलाखतीमध्ये सनीनं आपण लहानपणी डिस्लेक्सिक असल्याचे म्हटले आहे. आजही मला काही शब्दांबाबत अडचणी येतात. त्यामुळे मला जेव्हा बोलण्यासाठी माईक दिला जातो तेव्हा काय बोलावे हे कळत नाही. भीती वाटते. अनेकांनी मी हे सांगतो तेव्हा त्यांना खोटे वाटते. पण ते खरे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yeola Assembly Election 2024: येवल्यात भुजबळांविरोधात शरद पवारांचा जरांगे पॅटर्न; शिंदेंना मैदानात उतरवून मोठी खेळी

Virender Sehwag: 'संघात फक्त सेहवागचीच मनमानी होती, त्याने मला...', मॅक्सवेलने पंजाब किंग्स संघातील वातावरणाची केली पोलखोल

Latest Maharashtra News Updates : काहीही करुन आम्हाला जिंकायचे आहे- सदा सरवणकर

MNS Candidate List: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पाचवी यादी जाहीर; कुणाला कुठून संधी?

Sports Bulletin 26th October: भारताचा न्यूझीलंडकडून मायदेशात १२ वर्षांनी पराभव ते एमएस धोनीकडून आयपीएल खेळण्याचे संकेत

SCROLL FOR NEXT