Sunny Deol Reaction on Gadar 3 And Border 2 esakal
मनोरंजन

Sunny Deol : 'गदर 3' अन् 'बॉर्डर 2' खरचं येणार? आता सनी देओलनचं दिली मोठी अपडेट!

गेल्या काही दिवसांपासून सनीच्या गदर ३ अन् बॉर्डर २ ची जोरदार चर्चा सुरु आहे.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Sunny Deol Reaction on Gadar 3 And Border 2 : सनी देओल या नावानं गेल्या वर्षी थिएटमध्ये गर्दी खेचली होती. निमित्तं होतं गदर २ चं. (Gadar 3) त्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवला. शंभर कोटींपेक्षा जास्त कमाई करुन एक वेगळा विक्रम आपल्या नावावर केला. यात आता सनीच्या गदर ३ आणि बॉर्डर २ (Border 2) ची चर्चा रंगली आहे. त्यावर सनीनं उत्तर दिलं आहे.

सनी देओलनं एका मुलाखतीमध्ये सांगितले की, मला अनेक ठिकाणी गदर ३ आणि बॉर्डर २ वरुन प्रश्न विचारले जातात. सनीनं हिंदूस्थान टाईम्सला (Sunny Deol Viral Interview) दिलेल्या त्या मुलाखतीमध्ये अखेर या दोन्ही चित्रपटावरुन स्पष्टपणे सांगितले आहे. तो म्हणतो, जेव्हापासून गदर २ आला तेव्हापासून असं म्हटलं जात आहे की मी गदर चा तिसरा पार्ट करतो आहे. अरे मी किती आणि कोणकोणत्या चित्रपटांचे पार्ट करणार आहे.

तुम्हाला सांगतो तुम्ही जे काही ऐकता आहात त्यात बऱ्याचशा अफवा आहेत. प्रत्येक गोष्टीवरुन अफवा उडवली जात आहे. माझ्या चित्रपटाविषयी मी स्वत: सांगेलच की. लोकांना अंदाज वर्तवण्यात आणि मोठमोठया गप्पा मारण्यात जास्त आनंद वाटतो म्हणून ते काहीही बोलत असतात. अशा शब्दांत सनीनं त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

लाहोर १९४७ ची तयारी..

गदर २ नंतर सनी हा त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. तो प्रोजेक्ट लाहोर १९४७ असा आहे. त्याविषयी अभिनेत्यानं सांगितले की, गदर २ च्या यशानंतर आम्ही या विषयावर चित्रपट तयार करायचा असा निर्णय घेतला. आता त्याचे काम सुरु आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून आम्ही या प्रोजेक्टसोबत जोडले गेलो आहोत. मात्र काही केल्या हा प्रोजेक्ट पुढे जात नव्हता.

गदर प्रदर्शित झाला आणि आमच्यासाठी संधीची दारं उघडली गेली. त्याचा चांगला परिणाम दिसून आला आणि आम्ही लाहोर १९४७ च्या चित्रिकरणाला सुरुवात केली. दिग्दर्शक राजकुमार हे खूपच प्रभावशाली आहेत. त्यांची गोष्ट काही वेगळीच आहे. त्यांच्याकडे खूप सारे प्रोजेक्ट आहेत. लोकांनी मला त्यांच्या वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये पाहिले आहे. मला माहिती आहे की, लोकांना माझ्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत पण मला हा प्रेशर जास्त काळ सहन होत नाही. असेही सनीनं यावेळी सांगितले.

सनी देओल अन राजकुमार संतोषी यांची हिट जोडी...

सध्या राजकुमार संतोषी हे लाहोर १८४७ चे दिग्दर्शन करत आहेत. तो चित्रपट आमिर खान प्रोड्युस करत आहे. सनी देओल आणि राजकुमार संतोषी हे पहिल्यांदा घायल या चित्रपटाच्या निमित्तानं एकत्र दिसले होते. त्यानंतर त्यांनी केलेल्या दामिनी या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. दामिनीसाठी सनी देओलला बेस्ट सर्पोटिंग अॅक्टरसाठी नॅशनल अॅवॉर्डनं गौरविण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Strike Rate: महायुतीचा जबरदस्त स्ट्राइक रेट! काय ठरले निर्णायक? विरोधकांचं झालं पानीपत

IND vs AUS 1st Test : नाद करा, पण Yashasvi Jaiswal चा कुठं? ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरी धुतले; गावस्कर, तेंडुलकर, कांबळी यांच्याशी बरोबरी

Latest Maharashtra News Updates : पुण्यात देवेंद्र फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून लागले बॅनर

IPL 2025 Mega Auction LIVE: आयपीएलचा मेगा लिलाव आज! ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुलसह मोठे स्टार आज रिंगणात!

Maharashtra Assembly Election Result: पुण्यातील 'या' मतदारसंघात अनेक वर्षांची परंपरा कायम; जनतेचा कौल नव्या आमदाराकडेच

SCROLL FOR NEXT