Sunny Leone esakal
मनोरंजन

Sunny Leone : अ‍ॅडल्ट फिल्म इंडस्ट्री ते कान्स फेस्टिवल; सनी लिऑनचा प्रवास

कांहींनी तिच्याकडे डोळे विस्फारुन तर बहुतेकांनी तिला कुचेष्ठेने पाहिले होते..

कामिल पारखे

Porn Star To Cannes Festival Journey Of Sunny Leone : सनी लिऑन.. सनी लिऑन  नावाभोवती एक वेगळेच वलय आहे. आंतरराष्ट्रीय  पातळीवरची प्रौढ करमणूक क्षेत्रातील भारतीय वंशाची एक व्यक्ती  म्हणून सुरुवातीची तिची ओळख भारतीयांना दोन दशकांपूर्वी झाली. कांहींनी तिच्याकडे डोळे विस्फारुन तर बहुतेकांनी तिला  कुचेष्ठेने पाहिले होते..  

सत्तरच्या दशकांत शहराशहरांत, गावोगावी  बस स्टॅंडपाशी, थिएटरपाशी नियतकालिकांची आणि पुस्तकांची दुकाने असायची, किरकोळ वर्गणीवर चालणारी खासगी ग्रंथालये असायची. तिथे पुस्तकांमध्ये अर्धवट झाकलेली पण तरीही अनेकांचे लक्ष  घेणारी काही पुस्तके असायची. तरुणांमध्ये आणि इतर वयोगटाच्या आंबटशौकिनांमध्ये  या पुस्तकांना खूप  मागणी असायची. वाचायची इच्छा असुनही ही पुस्तके घेण्याचे धाडस  अनेकांमध्ये नसायचे. प्रौढ  करमणूक  क्षेत्रातील ही पुस्तके होती.

नव्वदच्या दशकात गोव्यातून पुण्याला आलो तेव्हा आमच्या वृत्तपत्र समुहाच्या आम्हा बातमीदारांची एका बातमीदाराच्या घरी एकदा पार्टी झाली. तो बातमीदार विवाहित होता तरी त्यांचे कुटुंब यावेळी घरी नव्हते. बाकीचे आम्ही सर्व पुरुष बातमीदार सडेफटिंग होतो. पार्टीच्या अखेरीस त्याने टेलिव्हिजन संचावर एक डीव्हीडी  लावली. चित्रे अगदी अस्पष्ट होती.   

त्यानंतरच्या काळात जागोजागी अशा सी-डीज  आणि डीव्हीडी खुल्लमखुलला  मिळू लागल्या. काही काळापूर्वी पुस्तकांच्या दुकानांत `पिवळी पुस्तके’ मिळायचे तसेच. अधूनमधून पोलिसांनी धड टाकून अशा आक्षेपार्ह डिव्हीडीजचा साठा ताब्यात घेतला अशा बातम्या वृत्तपत्रांतून झळकायच्या.

याच काळात विकेन्डच्या पुर्वसंध्येला - खरे म्हटले तर शुक्रवारी - शनिवारी मध्यरात्रीला - सर्व लोक झोपायला गेले असताना टीव्हीवर अचानक दुसरीच दृश्ये दिसायला लागायची. अनेक ठिकाणी स्थानिक केबल ऑपरेटर्स  आपल्या ग्राहकांसाठी ही खास सेवा पुरवत असत. या गोष्टीचा खूप बोलबाला झाल्याने ही सेवा खंडीत झाली आणि अनेकांचा रसभंग झाला, मात्र तोपर्यंत इतर कितीतरी पर्याय उपलब्ध झाले होते.

तर अशा या उघडपणे त्याज्य असलेल्या प्रौढ करमणूक क्ष्रेत्रातील सनी लिऑन हे भारतात  माहित झालेले एक प्रमुख नाव.      

 या सनी लिऑनला जवळून प्रत्यक्ष पाहण्याचा योग अलीकडेच काही वर्षांपूर्वी आला होता  आपल्या नवीन चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी त्या चित्रपटाचे अभिनेते आणि अभिनेत्री  आमच्या इंग्रजी दैनिकाच्या कार्यालयात येत असत. अशा  मुलाखती देणे हा त्या  चित्रपट कलावंतांनी चित्रपट निर्मात्यांशी केलेला कराराचा भागच असतो, हे चित्रपट कलाकार अशा मुलाखतीला सामोरे जाण्यास नकार देऊ शकत नाही हे नंतर लक्षात आले.

अशा प्रकारच्या प्रायोजित मुलाखती संपादकीय विभागातील फीचर्स टीममधले सहकारी घ्यायचे. फीचर्स विभाग म्हणजे सॉफ्ट बातम्या देणारे लोक.

आम्हा बातमीदारांचा विभाग फीचर्स टीमला लागून असायचा आणि त्यामुळे शेजारच्या  कॉन्फरन्स रुममधल्या या मुलाखतीला बसता यायचे किंवा हे नट आणि नट्या येताना आणि जाताना त्यांचे दर्शन घडायचे.

नाना पाटेकर आणि इतर काही कलाकार मंडळी `नटसम्राट’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली होती. इरफान खान हा या असल्या एका  प्रमोशन मुलाखतीला आलेला माझा अत्यंत  आवडता अभिनेता.

मात्र या काळात मुलाखतीला आलेल्या चित्रपट कलावंताला पाहण्यास ऑफिसच्या गेटबाहेरआणि आत सर्वाधिक गर्दी झाली ती फक्त एकदाच.  

त्यावेळी ऑफिसबाहेर लोकांची प्रचंड गर्दी झाल्याने परिस्थिती हाताबाहेर जाते आहे असे दिसले. शेवटी जवळच्या पोलिस चौकीला फोन करून वाढीव सुरक्षा कुमक बोलावी लागली होती 

आणि यावेळी मुलाखतीसाठी आली होती सनी लिऑन. आपल्या नवऱ्यासह चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती आली होती.

भरपूर उंची आणि उत्तम फिगर राखून असलेली सनी लियॉन गेटपासून कॉन्फरन्स रूमकडे येऊ लागली तेव्हा तिच्यावर खिळलेल्या सर्वांच्या नजरा माझ्या आजही आठवणीत आहे. भरपूर संख्येने असलेले तिचे बॉडी गार्ड्स आगंतुक लोकांना तिच्यापासून सुरक्षित अंतरावर ठेवत होते.

त्यावेळी कॉन्फरन्स रुम तर फीचर्स टीम मधल्या सहकाऱ्यांसह बातमीदार, जाहिरात  आणि इतर विभागांतील लोकांनी गच्च भरली होती.

मुलाखत कशी झाली आणि सनी लिऑन नेमकी काय बोलली हे आता आठवत नाही. मात्र  मुलाखतीनंतर तिच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी  झालेली गर्दी आणि तिच्या बॉडीगार्डसनी काही लोकांना दाखवलेला हिसका मला आजही आठवतो.

काही लोकांनी सनी लियॉनबरोबरच्या गर्दीत असलेले आपले  सेल्फीज आंणि इतर फोटो समाज माध्यमांवर टाकले होते आणि या फोटोंना प्रचंड लाइक्स आणि कमेंट्स मिळाल्या होत्या.

तर अशी आगळीवेगळी कीर्ती असलेल्या या सनी लिऑनला अलिकडेच जागतिक चित्रपटसृष्टीतअत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या फ्रान्समधल्या कान्स फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर स्वागत होण्याच्या सन्मान मिळाला.

` कान्स फेस्टिव्हल २०२३’ साठी नामांकन कमावलेल्या अनुराग कश्यप यांनी दिग्दर्शित केलेल्या `केनेडी' चित्रपटातील एक कलाकार म्हणून सनी लिऑन या समारंभात सहभागी झाली होती. असा सन्मान खूप दुर्लभ असतो हे सांगायलाच नको.     

या निमित्त सनी लिऑन हिची अनेक वृत्तपत्रांनी खास दाखल घेतली आहे. प्रौढ करमणूक क्षेत्रातील कलाकार ते कान्स फेस्टिव्हल असा प्रवास केलेल्या सनी लिऑन साठी तो किती स्मरणीय अनुभव असेल याची कल्पना करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EXIT POLL: एक्झिट पोल आले! सरकार कुणाचं येणार? महाविकास आघाडी की महायुती?

IND vs AUS: विराटवर शरीरवेधी मारा करा... कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या माजी विकेटकिपर नक्की काय म्हणाला?

मतदानासाठी शेवटचे १५ मिनिटे शिल्लक! सोलापूर जिल्ह्यात ५७.०९ टक्के मतदान; दक्षिण सोलापूर, शहर मध्य व शहर उत्तर या ३ मतदारसंघात सर्वात कमी मतदान

Champions Trophy 2025: भारत-पाकिस्तान वादात ICC चं मरण, कायदेशीर कारवाईची टांगती तलवार; जाणून घ्या नेमकं कारण

Maharashtra Election: राज्यभरात मतदान केंद्रांची तोडफोड, कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; जाणून घ्या कुठे काय घडलं?

SCROLL FOR NEXT