Bollywood Celebrity ED Raid : Esakal
मनोरंजन

Bollywood Celebrity ED Raid: दुबईच्या लग्नाला जाणं बॉलिवूड कलाकारांच्या आलं अंगलट! 'या' 14 स्टार्सना ईडी पाठवणार समन्स?

Vaishali Patil

Bollywood Celebrity ED Raid: काही दिवसांपुर्वी महादेव ऑनलाइन बेटिंग हे मोठं प्रकरण समोर आलं होतं. 'महादेव बुक' हे ऑनलाइन बेटिंग अॅप असून याद्वारे बेकायदेशीर सट्टेबाजी सुरु होती अशी शंका अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीला आली होती. आता ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे.

महादेव ऑनलाइन बेटिंग घोटाळ्यात ईडीने 417 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या कारवाईसोबतच ईडीने कोलकाता, भोपाळ, मुंबईसह 39 शहरांमध्ये महादेव या ऑनलाईन अॅपशी जोडलेल्या मनी लॉन्ड्रिंग नेटवर्कच्या विरोधात मोठी कारवाई केली.

आता या प्रकरणी आणखी एक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी ईडी आता अनेक बॉलिवूड कलाकार, गायक आणि राजकारणी यांना चौकशीसाठी बोलावणार असल्याची माहिती समोर येत आहे.

बेटिंग अॅप चालवणाऱ्या आरोपीच्या लग्नात काही कलाकार परफॉर्म करताना दिसून आले होते. सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्या लग्नाच्या पार्टीत या चित्रपट कलाकारांनी परफॉर्म केले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, टायगर श्रॉफ, सनी लिओन, नुसरत भरुचा, कृष्णा अभिषेक, अली असगर, विशाल ददलानी, पुलिकट सम्राट, नेहा कक्कर, एली अवराम, भारती सिंग, , भाग्यश्री, आतिफ अस्लम, राहत फतेह अली खान कृती खरबंदा, सुख्वींदर यांच्यासह अनेक कलाकार आणि गायक उपस्थित होते . या वर्षी फेब्रुवारीमध्ये महादेव बुक अॅपचे सौरभ चंद्राकर यांचा युएईमध्ये विवाहसोहळा पार पडला होता.

या कलाकारांना नागपूरहून खासगी जेटनं दुबईला नेलं होतं. या लग्नसोहळ्यावर दोन्ही आरोपींनी 200 कोटी रुपये खर्च केले होते. हवालाच्या माध्यमातून या कलाकारांना 112 कोटी रुपये देण्यात आल्याची चर्चा आहे. मनी लॉड्रिंग प्रकरणात ईडीनं आता मोठी कारवाई करणार असून या कलाकारांना ईडी समन्स पाठवणार आहे आणि चौकशीसाठी बोलणार अशी चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Vidhansabha: गणपत गायकवाडांनी ज्यांच्यावर गोळ्या झाडल्या त्या महेश गायकवाडांची शिवसेनेतून हकालपट्टी

पुन्हा trump सरकार! कमला हॅरिस यांचा पराभव करत पुन्हा बनणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, बहुमताचा आकडा केला पार

Hot Water Side Effects :  आरोग्यासाठी चांगलं असलं तरी अशा लोकांनी कधीच पिऊ नये गरम पाणी, त्रास अधिक वाढेल

Devendra Fadnavis: राहुल गांधींच्या हातातील संविधान 'लाल' का? देवेंद्र फडणवीसांनी का घेतली शंका?

Maharashtra Vidhansabha: विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा 'कलरकोड' प्लॅन, जाणून घ्या आतल्या गोटातील बातमी

SCROLL FOR NEXT