sunny marathi movie teaser released directed by hemant dhome cast lalit prabhakar  sakal
मनोरंजन

Sunny teaser: हेमंत ढोमेच्या 'सनी'चा टिझर रिलीज.. ललित दिसला शर्टलेस..

घरापासून दूर राहिलेल्या प्रत्येकाची गोष्ट म्हणजे 'सनी'

नीलेश अडसूळ

sunny marathi movie: मागील काही दिवसांपासून बऱ्याच कलाकारांच्या सोशल मीडियावर #घरापासून_दूर चा जोरदार ट्रेंड दिसत आहे. यात हेमंत ढोमे, (hemant dhome) ललित प्रभाकर (lalit prabhakar), क्षिती जोग, चिन्मय मांडलेकर अशा काही कलाकारांचा समावेश आहे. हे नेमकं काय प्रकरण आहे, याबाबत अनेक तर्कवितर्क काढले जात असतानाच आता या हॅशटॅगमागे लपलेले गुपित सर्वांच्या समोर आले आहे. झिम्मा या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा पुढचा चित्रपट 'सनी' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे टिझर सोशल मीडियावर झळकले असून #घरापासूनदूर चे उत्तर मिळाले आहे. (sunny marathi movie teaser released directed by hemant dhome cast lalit prabhakar )

टीझरमध्ये ललित प्रभाकर म्हणजेच 'सनी' शिक्षणासाठी परदेशात गेल्याचे दिसत असून तो पाठीमागे काहीतरी सोडून आल्याची त्याला सतत जाणीव होतेय. असं म्हणतात, लांब गेल्यावरच जवळच सापडतं. असाच काहीसा अनुभव सनीला येत असल्याचे यात दिसतेय. त्याच्या मनात चाललेली ही चलबिचल नेमकी कशासाठी आहे, याचे उत्तर आपल्याला १८ नोव्हेंबरला मिळणार आहे. क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित, या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून अक्षय बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस, उर्फी काझमी 'सनी'चे निर्माते आहेत. तर संतोष खेर आणि तेजस्वनी पंडित सहनिर्माते आहेत.

'सनी'बद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, '' खरंतर ही माझीच गोष्ट आहे पण कधी ना कधी घरापासून दूर राहिलेल्या प्रत्येकाची गोष्ट आहे, अनेकदा असे होते, घरापासून दूर गेल्यावर काही गोष्टींची किंमत आपल्याला कळते आणि कदाचीत नवी नाती, नवं जग सापडतं. आपल्या आयुष्याला नवा आकार येतो आणि आपली सर्वार्थाने वाढ होते. हेच अगदी हलक्याफुलक्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न 'सनी'मध्ये करण्यात आला आहे. संपुर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा असा एक मजेशीर चित्रपट आहे.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivajinagar Assembly Election 2024 Result: सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी; सलग दुसऱ्यांदा आले निवडून

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT