Prasad Aajgoankar esakal
मनोरंजन

Prasad Aajgoankar: 'अ‍ॅनिमेशन' चित्रपटात 'पेशन्स' महत्वाचे!'

अ‍ॅनिमेशन दिग्दर्शक प्रसाद आजगावकर आणि iRealities स्टुडिओ यांनी तयार केलेला तसेच डॉ. करण सिंग यांची निर्मिती असलेला सुप्रीम मदरहूड हा पंजाबी भाषेतील अ‍ॅनिमेशन चित्रपटाचे नुकतेच लंडनमध्ये करण्यात आले.

संतोष भिंगार्डे

Prasad Aajgoankar: अ‍ॅनिमेशन दिग्दर्शक प्रसाद आजगावकर आणि iRealities स्टुडिओ यांनी तयार केलेला तसेच डॉ. करण सिंग यांची निर्मिती असलेला सुप्रीम मदरहूड हा पंजाबी भाषेतील अ‍ॅनिमेशन चित्रपटाचे नुकतेच लंडनमध्ये करण्यात आले. आता प्रसाद आजगावकर लवकरच दोन भव्य असे अ‍ॅनिमेशन चित्रपट तयार करीत आहेत. याबाबत त्यांच्याशी साधलेला संवाद...

* तुमच्या सुप्रीम मदरहूड...द जर्नी ऑफ माता साहिब कौर या चित्रपटाचे प्रदर्शन लंडनमध्ये झाले. त्याबाबतीत काय सांगाल

- तेथील शीख समुदायामुळे हे शक्य झाले. त्यामुळे मी त्यांचा खूप आभारी आहे. भारतातील हा पहिलाच चित्रपट आहे की ज्याचे लंडन येथील संसदेत प्रदर्शन झाले. तेथील मान्यवरांनी चित्रपटाचे चांगले स्वागत केले. आमच्यासाठी ही अभिमानाची बाब होती. यामुळे आता आमची हुरूप आणखीन वाढलेला आहे. पंजाबी सहा चित्रपट आणि दोन मराठी चित्रपट आता आम्ही बनवीत आहोत. मोरया गणेशा असे एका मराठी चित्रपटाचे नाव आहे. हा नव्वद मिनिटांचा अ‍ॅनिमेशन चित्रपट असेल. तसेच महारष्ट्रातील साधू-संतांवर अ‍ॅनिमेशन चित्रपट आम्ही आता तयार करणार आहोत. त्याबाबतीत आताच बोलणे उचित ठरणार नाही. मात्र आता आमचे एकापाठोपाठ एक चित्रपट येतील.

* अ‍ॅनिमेशन क्षेत्रात यावे असे तुमच्या मनात केव्हा आणि कधी आले......

--मुळात मी इंजिनियर. अ‍ॅनिमेशनची फारशी माहिती नव्हती. पण प्रचंड आवड होती. अ‍ॅनिमेशन चित्रपट वगैरे मला खूप आवडायचे. त्यामुळे अ‍ॅनिमेशनमध्ये काही तरी करावे म्हणजे आपल्या आवडीच्या क्षेत्रात काही तरी करावे असे वाटले. हळूहळू सर्व बाबी शिकत गेलो आणि मी या क्षेत्रात आलो. पहिल्यांदा आम्ही स्टार प्लससाठी आंतरिक्ष नावाची मालिका बनविली. ही साय फाय मालिका होती आणि तेव्हापासून मनोरंजन क्षेत्रातील माझा प्रवास सुरू झाला. या मालिकेला खूप पुरस्कार मिळाले. त्यानंतर आम्ही वॉर्नर ब्रदर्ससाठी बर्ड आयडाॅल हा चित्रपट बनविला. हळूहळू मनोरंजन क्षेत्राचे दरवाजे उघडले गेले. त्यानंतर अनेक चित्रपट बनविले. आमच्या चार साहिबजादे या पंजाबी चित्रपटाचे खूप कौतुक झाले. त्याला पुरस्कारही मिळाले. त्याचा खूप आनंद झाला. पण मी पुरस्कारांचा फारसा विचार करीत नाही. मी माझे काम करीत राहतो.

* धार्मिक-ऐतिहासिक विषयावर चित्रपट किंवा सीरीज येतात आणि त्यावरून कधी कधी वाद निर्माण होता. लोकांच्या भावना दुखावल्या जातात. त्यामुळे अ‍ॅनिमेशन चित्रपट बनविताना सतर्कता किती पाळावी लागते...

- चित्रपट वा मालिका आपण लोकांसाठी बनवीत असतो. त्यामुळे त्यांच्या भावनांचा विचार पहिल्यांदा करावा लागतो. त्यांच्या भावनांना ठेच पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी लागते. मग धार्मिक वा ऐतिहासिक अर्थात विषय कोणताही असला तरी तो अतिशय गंभीरपणे हाताळावा लागतो. खूप सतर्कता पाळावी लागते. कोणतीही चुकीची माहिती जाता कामा नये याची पुरेपूर काळजी घ्यावी लागते. धार्मिक विषय हा नाजूक असतो आणि तो गंभीरपणे हाताळावा लागतो.

* अ‍ॅनिमेशन चित्रपट बनविताना कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते...

- अ‍ॅनिमेशन चित्रपट असो वा अन्य कोणताही चित्रपट. फिल्म मेकिंग हे सगळीकडे सारखेच असते. सगळीकडे तेवढीच मेहनत घ्यावी लागते. अॅनिमेशन चि6पट बनविताना ही मेहनत अधिक असते. कारण हिंदी चित्रपटात एखाद्या हिरो वा हिरोईऩला रडायला सांगितले तर ती रडते. परंतु अ‍ॅनिमेशन आपल्याला त्या व्यक्तिरेखेला रडवावे लागते. अ‍ॅनिमेशन प्रचंड मेहनत आणि पेशन्स ठेवावे लागतात. एक अॅनिमेटर एका दिवसाला केवळ दोन सेकंदाची निर्मिती करतो. परंतु जेव्हा हे काम पूर्ण होते तेव्हा त्याचा आनंद काही औरच असतो. आता तांत्रिक बाबींमध्ये दिवसेंदिवस खूप बदल होत आहेत आणि अ‍ॅनिमेशन अधिकाधिक विकसित होत आहे.

* अ‍ॅनिमेशन चित्रपटासाठी कशा प्रकारचा अभ्यास करावा लागतो..

- खूप अभ्यास करावा लागतो.. पहिल्यांदा अनाॅटाॅमीचा अभ्यास करावा लागतो. त्या व्यक्तिरेखेच्या शरीराचा, चेहऱ्याचा, डोळ्यांचा वगैरे अभ्यास करावा लागतो. त्याचबरोबर प्रत्येक सिच्युएशनला त्याची वागणूक कशी असेल याचा अभ्यास करावा लागतो. विविध गोष्टींचे संशोधन आणि अभ्यास करावा लागतो. अॅनिमेशन हे सगळ्यात अवघड गोष्ट आहे. यामध्ये प्रचंड मेहनत आहे.

* उत्तम अॅनिमेटर होण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे असे तुम्हाला वाटते..

- तुम्हाला आर्ट यायला हवी. कारण येथे सगळ्या गोष्टी आर्टशी निगडीत आहेत. त्यामुळे ते आवश्यक. दुसरे संशोधन करण्याची कमालीची वृ्त्ती हवी. नंतर खूप पेशन्स. डोक्यावर बर्फ ठेवून काम करावे लागते.

* आगामी प्रोजेक्ट काय आहेत...

- तिरुपती बालाजीवर आम्ही चित्रपट बनवीत आहोत. तसेच वैष्णोदेवीवर आणि ब्रह्मकुमारीच्या संस्थापकांवरदेखील आम्ही चित्रप बनवीत आहोत. आगामी पाचेक वर्षात अॅनिमेशन चित्रपटांची संख्या वाढेल. हिंदी, इंग्रजी, मराठी, पंजाबी व गुजराती अशा विविध भाषांत चित्रपट बनविले जातील. मराठीतही चांगले प्रोजेक्ट येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

IND vs AUS: पर्थ कसोटीत ऋषभ पंतसोबत IPL ऑक्शनची चर्चा; हाय व्होल्टेज सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या संवादाचा Video Viral

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

SCROLL FOR NEXT