Suraj Kumar injured in major accident, actor's leg amputated dr rajkumar family member  SAKAL
मनोरंजन

Suraj Kumar: उजवा पाय गमावला! प्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचा भीषण अपघात

शनिवारी म्हैसूर-गुंडलुपेट महामार्गावर झालेल्या अपघातात अभिनेता गंभीर जखमी झाला

Devendra Jadhav

Suraj Kumar Accident News: अभिनेता सूरज कुमार उर्फ ​​ध्रुवनला मोठ्या अपघाताला सामोरं जावं लागलं आहे.

शनिवारी म्हैसूर-गुंडलुपेट महामार्गावर झालेल्या अपघातात सुरज गंभीर जखमी झाला. त्याला गंभीर दुखापत झाली असून, म्हैसूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सूरज कुमार हे डॉ. राजकुमार यांच्या पत्नी श्रीमती पर्वतम्मा यांचे पुतणे आहेत. वृत्तानुसार, या अपघातात सूरजच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली होती, ऑपरेशन दरम्यान डॉक्टरांना हा पाय कापावा लागलाय.

(Suraj Kumar injured in major accident, actor's leg amputated dr rajkumar family member)

खरं तर, 25 जूनच्या संध्याकाळी 24 वर्षीय सूरज कुमार म्हैसूरहून उटीला बाईकवर जात असताना ट्रॅक्टरला ओव्हरटेक करून त्याचा तोल गेला.

गुंडलुपेट तालुक्यातील हिरीकाठी गेटजवळ दुपारी ४ वाजताच्या सुमारास त्याला एका टिप्पर लॉरीने धडक दिली, त्यानंतर सूरजला म्हैसूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, सूरजच्या फिल्मी करिअरची सुरुवात 2019 मध्ये झाली, जेव्हा त्याने दिग्दर्शक रघु कोवीच्या चित्रपटातून पदार्पण केले.

शिवा राजकुमार आणि दर्शन यांनी या चित्रपटासाठी टाळ्या मिळवल्या आणि कन्नड चित्रपट उद्योगात मोठ्या धूमधडाक्यात प्रवेश केला. हा चित्रपट चालला नाही. ध्रुवनने यानंतर दुसरा चित्रपट केला, परंतु तो त्याच्या करिअरसाठी फायदेशीर ठरला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह'प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT