टी.व्ही अभिनेत्री चारु असोपाचं लग्न तुटल्याच्या चर्चांमध्येच आणखी एका टी.व्ही वरील प्रसिद्ध अभिनेत्री संदर्भात धक्कादायक बातमी कानावर पडतेय. 'शगुन' फेम अभिनेत्री सुरभि तिवारी(Surbhi Tiwari) तिच्या पतीपासून विभक्त(Divorce) होण्याच्या मार्गावर आहे. जवळ-जवळ २ वर्षापूर्वी २०१९ मध्ये सुरभिने दिल्ली स्थित पायलट आणि व्यावसायिक प्रवीण कुमार सिन्हा सोबत लग्न झालं होतं. अभिनेत्रीचं म्हणणं आहे की,लग्नानंतर लगेचच तिला प्रचिती आली की प्रवीण आणि ती एकमेकांसाठी परफेक्ट मॅच नाही आहेत. लग्नानंतर अशा काही गोष्टी घडल्या ज्यामुळे पतीपासून विभक्त होण्याचा आपण निर्णय घेतल्यासंदर्भात सुरभीनं स्पष्ट केलं आहे. (Surbhi Tiwari accuses husband of domestic violence)
केवळ पती नाही तर सासू,नणंद यांनी देखील आपल्याला खूप त्रास दिल्याचं अभिनेत्रीचं म्हणणं आहे. अखेर आपल्याला पतीसोबत त्याच्या कुटुंबात राहायचे नसून, आता त्याच्याकडून अन् त्याच्या कुटुंबाकडून करण्यात आलेल्या आपल्यावरील अत्याचारांविरोधात तिनं आवाज उठवण्याचं ठरवलं आहे. एका हिंदी वेबसाइटशी मुलाखती दरम्यानं अभिनेत्रीनं आपल्या आयुष्यातील अनेक कडवड प्रसंगांचा खुलासा केला आहे.
अभिनेत्रीनं सांगितलं आहे की,''प्रवीण माझ्यासोबत सुरुवातीला मुंबईला येण्यासाठी तयार होते परंतु त्यानंतर त्यांनी आपली ट्रान्सफर करुन घेण्यासाठी नकार दिला. मला माझं अभिनयक्षेत्रातलं करिअर सुरू ठेवायचं होतं. पण मी मालिका करु शकत नव्हते कारण मी पतीसोबत दिल्लीत राहत होते. आणि त्यामुळे मी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे माझ्या पतीवर अवलंबून होते. याव्यतिरिक्त,मला माझं कुटुंब सुरू करायचं होतं,मला मुलांना जन्म द्यायचा होता पण त्यासाठी देखील माझा पती तयार नव्हता''.
'शगुन' मालिकेतील अभिनेत्री,जिला शेवटचं 'एक रिश्ता साझेदारी का' या मालिकेत पाहिलं गेलं होतं,तिनं आपला पती प्रवीण आणि त्याच्या कुटुंबावर कौटुंबिक अत्याचाराचे आणि धमकावल्याचे आरोप लावले आहे. अभिनेत्रीनं वर्सोवा पोलिस ठाण्यात आपल्या पतीविरोधात २० जून रोजी तक्रार दाखल केली होती. तसंच,१२ मे रोजी अंधेरीच्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात कौटुंबिक अत्याचाराचा गुन्हा देखील दाखल केला होता.
यासंदर्भात सुरभी म्हणाली, ''मी प्रवीण,त्याची आई,बहिणी विरोधात तक्रार दाखल केली आहे. मला माझे दागिने परत हवे आहेत,ज्यांच्यावर माझा हक्क आहे. लग्नात माझ्या पतीला आणि मला माझ्या माहेरहून सोन्याच्या दागिन्यांसोबत काही चांदीची भांडी,वस्तू देखील देण्यात आली होती. पण मला ते घर सोडताना काहीच देण्यात आलेलं नाही. माझ्याकडे पैसे असते तर मला जिवंत राहण्यासाठी आणि माझ्या औषधोपचाराच्या खर्चासाठी दागिने विकायची वेळ आली नसती,त्यासाठी मला माझे दागिने परत हवे आहेत ''.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.