Surinder Shinda Passed Away Age 64 Popular Punjabi Singer esakal
मनोरंजन

Singer Surinder Shinda Death: प्रसिद्ध पंजाबी गायक सुरिंदर शिंदा यांचे निधन

सकाळ डिजिटल टीम

Surinder Shinda Passed Away Age 64 Popular Punjabi Singer : प्रसिद्ध पंजाबी गायक सुरिंदर शिंदा यांच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वयाच्या ६४ व्या वर्षी या गायकानं अखेरचा श्वास घेतला आहे. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखलही करण्यात आले होते.

पंजाबी मनोरंजन विश्वामध्ये सुरिंदर शिंदा यांचे मोठे नाव होते. त्यांच्या गायकीचा मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या आगळ्या वेगळ्या गायकीनं त्यांनी वेगळी ओळख तयार केली होती. केवळ गायनच नाही तर अभिनयाच्या क्षेत्रात देखील त्यांनी वेगळी छाप प्रेक्षकांच्या मनात उमटवली होती. सोशल मीडियावर त्यांच्या हजारो चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

लुधियानातील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात ते बऱ्याच दिवसांपासून उपचार घेत होते. मात्र त्यांना वाचविण्यात डॉक्टरांना अपयश आले. काही दिवसांपूर्वी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ट्रक बिलिया आणि पुत्त जट्टन दे सारखी अनेक गाण्यांचे लोकप्रिय गायक म्हणून त्यांची ओळख होती.

शिंदा यांच्या जाण्यानं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सुत्रांनी दिलस्या माहितीनुसार, डॉक्टरांनी शिंदा यांच्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. गेल्या वीस दिवसांपासून ते रुग्णालयात उपचार होते. शिंदा यांच्या मुलानं त्यांच्या आरोग्याविषयीची माहिती माध्यमांना दिली होती. काही दिवसांपूर्वी त्यावरुन वेगवेगळ्या अफवांना देखील उधाण आले होते.

मनिंदर शिंदा यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून वडिलांच्या निधनाची माहिती चाहत्यांना दिली. सुरिंदर शिंदा यांच्या गाण्याविषयी सांगायचे झाल्यास जट जियोना मोर, पुत्त जट्टन दे, ट्रक बिलिया, बलबीरो भाभी आणि काहर सिंह दी मौत ही गाणी चाहत्यांममध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mharashtra Vidhansabha Election Declared: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर! आचारसंहिता लागू, मतदान आणि निकालाची तारीख काय?

Election Commission Press Conference LIVE : थोड्याच वेळात वाजणार विधानसभा निवडणुकीचं बिगुल!

Maharashtra Assembly Election 2024: पंकज भुजबळांनाच आमदारकी का? महायुतीने मराठा मतांचा नाद सोडून दिलाय का? 'असं' आहे राजकीय गणित

Ladki Bahin Yojana: ''निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राबविलेल्या फुकटच्या योजना म्हणजे लाच'' निवडणूक आयोगासह सरकारला कोर्टाची नोटीस

Noel Tata: टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष नोएल टाटा भारताचे नागरिक नाहीत; कोणत्या देशाचे आहेत नागरिक?

SCROLL FOR NEXT