मुंबई - दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Death of actor Sushant singh rajput) मृत्युप्रकरणाचा तपास अद्याप सुरु आहे. त्याप्रकरणी आतापर्यत अनेकांची तपासणी करण्यात आली आहे. मध्यंतरी हा तपास बॉलीवूडपर्यतही आला होता. त्यावेळी बॉलीवूडमधील ड्रग्ज रॅकेट (bollywood drugs case) समोर आले होते. आता सुशांतच्या दोन नोकरांकडे तपास करण्यासाठी एसीबीनं त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. सुशांतच्या आत्महत्येला एक वर्ष पूर्ण होणार आहे. अजूनही त्याच्या त्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. (ncb summons late sushant singh rajput questioning lawyer vikas singh gave reaction)
नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोनं (narcotics control bearu) अभिनेता सिध्दार्थ पिठानीला काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यानंतर आता त्याच्या घरात काम करणारे दोघांना समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावणे पाठवले आहे. या दोघांपैकी एक जण आचारी तर दुसरा घरात साफसफाई करणारा आहे. त्यांच्याकडून एनसीबीच्या हाती काय लागते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुशांतनं जेव्हा आत्महत्या केली त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा त्याच्या नोकरानं सांगितलं होतं की, तो अंमली पदार्थांचे सेवन करतो. या धक्कादायक बातमीनं सर्वांना आश्चर्य वाटले होते. सुशांत अंमली पदार्थांचे सेवन करु शकतो यावर त्याच्या चाहत्यांचा विश्वास बसत नव्हता. मात्र जेव्हा त्याच्या नोकरानं हे सांगितल्यावर अनेकांनी संशय व्यक्त करण्यास सुरुवात केली होती.
आता अशी माहिती मिळते आहे की, गेल्या आठ महिन्यांपासून नीरज आणि केशव हे दोघेजण एनसीबीला चुकवत होते. ते मुंबई बाहेर एकमेकांना भेटतही होते. ज्यावेळी ते पुन्हा मुंबईत आले तेव्हा पुन्हा बॉलीवूडमधील काही सेलिब्रेटींकडे काम करत होते. यापूर्वी सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात सिध्दर्थ पिठानीला हैद्राबाद मधून अटक करण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.