sushant singh rajput 
मनोरंजन

सुशांत मृत्यू प्रकरण: 'तो' महाराष्ट्राच्या बदनामीचा कट होता!

सुशांत मृत्यू प्रकरण: 'तो' महाराष्ट्राच्या बदनामीचा कट होता! महाविकास आघाडी सरकारच्या बड्या नेत्याचा घणाघाती आरोप Sushant Singh Rajput Death Case NCP Nawab Malik Says it was just a plan to defame Mahavikas Aghadi Govt Image vjb 91

विराज भागवत

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचा गेल्या वर्षी जून महिन्यात संशयास्पद मृत्यू झाला. काहींनी ती आत्महत्या असल्याचे म्हटले तर काहींनी त्याची हत्या झाली असल्याचा आरोप केला. या साऱ्या प्रकरणाचा तपास राज्यातील तपास यंत्रणांकडून काही दिवसांत केंद्रातील तपास यंत्रणांकडे गेला. या प्रकरणात बड्या बॉलिवूड सेलिब्रिटींची चौकशीही झाली. पण अद्याप ठोस असे काहीच सांगण्यात आलेले नाही. याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी टीका केली. सुशांतच्या मृत्यूच्या तपासादरम्यान महाराष्ट्राला बदनाम करण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

"सुशांतसिंग राजपूतच्या केसमध्ये, ती हत्या होती की आत्महत्या होती हे सीबीआयने एक वर्ष झाले तरी अद्याप स्पष्ट केलेले नाही. याचा अर्थ हे केवळ महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान होते", असा थेट आरोप मलिक यांनी केला. "सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयने ताब्यात घेऊन आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र अजूनही यामध्ये सीबीआयने कोणताच खुलासा केला नाही. याबाबत शंका उपस्थित केली जात आहे", असेही ते म्हणाले.

"एखादी घटना घडली की त्या-त्या राज्यात तपास केला जातो. मात्र सुशांतसिंग राजपूतच्या प्रकरणात बिहार सरकारने त्यांच्या हद्दीत हत्येचा गुन्हा दाखल करुन प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी दिले. सीबीआय एक वर्ष या प्रकरणाचा तपास करत आहे. पण अजूनही सुशांतची हत्या की आत्महत्या हे सीबीआय सांगू शकलेली नाही. बिहार निवडणुकीत राजकीय फायदा उठवण्यासाठीच सुशांतसिंग राजपूतचे प्रकरण रंगवण्यात आले", असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT