Sushant Sister Shweta News esakal
मनोरंजन

Sushant Sister Shweta Video : 'मोदीजी भावाच्या निधनाला ४५ महिने झाले अजूनही...' सुशांतच्या बहिणीनं श्वेतानं केली 'ही' मागणी!

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची बहीण श्वेता किर्तीनं (Sushant Sister Shweta Video) तिच्या व्हिडिओतून मोदींना साकडे घातले आहे.

युगंधर ताजणे

Sushant Singh Rajput sister shweta Singh Kirti : बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणानं बॉलीवूड हादरुन गेलं होतं. त्याच्या निधनानं (Sushant Singh Rajput Death Case) वेगवेगळे प्रश्न उपस्थित झाले होते. दरम्यान या प्रकरणानं वेगळं वळणही घेतले होते. सीबीआयनं (CBI) या प्रकरणाचा तपास करताना अनेक बॉलीवूड सेलिब्रेटींची तपासणी केली होती.

आता सोशल मीडियावर सुशांतची बहीण श्वेतानं पोस्ट केलेला व्हिडिओ सुशांतच्या चाहत्यांचे (Shweta Kirti Sushant Singh Sister) अन् नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. यापूर्वी देखील श्वेतानं वेगवेगळ्या पोस्टमधून सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात तातडीनं न्याय मिळावा म्हणून तपास यंत्रणांकडे धाव घेतली होती.

प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूतची बहीण श्वेता राजपूतनं एका व्हिडिओमधून पंतप्रधान (PM Narendra Modi) नरेंद्र मोदी यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. गेल्या ४५ महिन्यानंतरही अद्याप सुशांत सिंगच्या प्रकरणातून आमच्या कुटुंबियांना कोणता न्याय मिळालेला (Sushant Singh Rajput Latest News) नाही. या सगळ्यात आम्हाला खूप मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागला आहे. सीबीआयचा तपास आणि न्यायालयीन लढा यातून आम्हाला न्याय मिळावा ही आपल्याला विनंती.

मोदीजी मी तुम्हाला आग्रहाची विनंती करते की, सुशांत सिंगच्या प्रकरणातून कित्येक प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत. सीबीआयच्या तपासाबाबत तुम्ही मदत केल्यास बरे होईल. तुमच्या मदतीनं आम्हाला खूप दिलासा मिळेल. सुशांतच्या निधनाला ४५ महिने उलटूनही त्याबाबत कोणताही तपास आणि त्यातून न्याय आम्हाला मिळालेला नाही. त्यामुळे मी आपल्याला विनंती करते की, या प्रकरणाची दखल घ्यावी.

पीके, राब्ता, एम धोनी अनटोल्ड स्टोरी, छिछोरे सारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप उमटविणाऱ्या सुशांत सिंगनं १४ जून २०२० रोजी मुंबईतील घरी आत्महत्या केली होती. त्याच्या निधनानं बॉलीवूडसह चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT